शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमृताप्रमाणे घेतला जातोय बकरीच्या दूधाचा शोध; १६०० रुपये मोजूनही मिळेना; पण झालंय तरी काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 14:37 IST

बकरीचं दूध विकणाऱ्यांना अच्छे दिन; ५० रुपयांचं दूध विकलं जातंय १६०० रुपयांना

गुरुग्राम: हरयाणात अचानक बकरीच्या दुधाची मागणी वाढली आहे. गुरुग्राममध्ये आधी बकरीचं दूध ५० ते ६० रुपये लिटर दरानं विकलं जायचं. आता त्याचा दर १६०० रुपये लिटरवर जाऊन पोहोचला आहे. मात्र तरीही बकरीचं दूध उपलब्ध होत नाहीए. तापाची साथ आल्यानं आणि प्लेटलेट्स घटल्यानं लोक बकरीचं दूध शोधत आहेत. बकरीच्या दूधानं प्लेटलेट्स वाढतात. त्यामुळे सध्या बकरीच्या दूधाला वाढती मागणी आहे.

बकरीच्या दूधासाठी लोकांची शोधाशोध सुरू आहे. बकरीच्या दुधामुळे प्लेटलेट्स वाढतात, असं आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचं ऍलोपॅथीचे डॉक्टर सांगतात. जिल्हा रुग्णालयातल्या ओपीडीत दररोज ८०० रुग्ण येतात. यातले ७० टक्के रुग्णांना ताप आहे. संपूर्ण शहरातील रुग्ण येणाऱ्या रुग्णालयात केवळ २ डॉक्टर आहेत. त्यामुळे अनेक जण घरगुती उपचारांचा आधार घेत आहेत.कोल्ड ड्रिंकच्या एका बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंटच्या नादात फसला अन्... 

तापाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कित्येक जण घरगुती उपचार घेत आहेत. बकरीचं दूध आणि पपईच्या पानांच्या आधारे प्लेटलेट्स वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्लेटलेट्स कमी असलेले रुग्ण बकरीच्या दुधाचा शोध घेत आहेत. याशिवाय पपईच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या गोळ्यांनादेखील मोठी मागणी आहे. 

सर्वसामान्यपणे बकरीच्या दुधाची किंमत ५० ते ६० रुपये लिटर असते. मात्र मागणी वाढल्यानं किंमत वाढली असल्याचं सेक्टर १२ मध्ये राहत असलेल्या अरविंद यांनी सांगितलं. 'माझ्या बहिणीला डेंग्यू झाला होता. त्यामुळे प्लेटलेट्स घटल्या. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी बकरीचं दूध खरेदी केलं. त्यासाठी १६०० रुपये मोजले,' असं त्यांनी सांगितलं. शहरात मोजक्या लोकांकडे बकऱ्या आहेत. त्यामुळे दुधासाठी ग्रामीण भागावर अवलंबून राहावं लागत असल्याचं ते म्हणाले.