शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

GoAir च्या पायलटची एवढी खतरनाक धमकी की प्रवाशांनी विमानातून काढला पळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:23 IST

वैमानिकाच्या खतरनाक धमकीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी वैमानिकासह सर्व कर्मचारी बदलण्याची मागणी केली, पण त्यांची मागणी मान्य न करता वैमानिक बदलला जाणार नाही असं गो-एअरने स्पष्ट केलं. अखेरीस...

नवी दिल्ली : विमानसेवा देणारी कंपनी गो-एअरच्या वैमानिकाने दिलेल्या एका खतरनाक धमकीमुळे  नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. संबंधित वैमानिकाने दिल्ली-बंगळुरू विमान क्रॅश करण्याची धमकी दिली होती, टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. मात्र, ही घटना केव्हाची आहे याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे गो-एअर प्रशासनाने या वृत्ताचं खंडन केलं आहे. नेमकं काय झालं -नवी दिल्लीहून बंगळुरूला जाणा-या गो-एअरच्या G8113 विमानात हा प्रकार घडला. सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी या विमानाने उड्डाण घेणं अपेक्षित होते. 5 वाजून 10 मिनिटांनी विमानाचं बोर्डिंग सुरू झालं. सर्व प्रवासी येऊन विमानात बसले, पण दोन तास होऊन गेले म्हणजे सकाळचे 7 वाजले तरी वैमानिकाचा पत्ता नव्हता. त्यामुळे विमानात बसलेले प्रवासी वैतागले आणि विमानाच्या बाहेर 'एअर ब्रिज'वर येऊन ते वैमानिकाची वाट पाहात थांबले. कोणतीही घोषणा होत नव्हती त्यामुळे चिडलेल्या काही प्रवाशांनी गोंधळ घालत आरडाओरडा करायला सुरूवात केली. थोड्यावेळाने वैमानिक विमानाच्या दिशेने येताना दिसला. वैमानिकाला पाहून काही प्रवाशांनी मोबाइल काढला आणि त्याची शूटिंग करण्यास सुरूवात केली. प्रवासी शूटिंग करत असल्यामुळे वैमानिक चिडला आणि त्याने शूटिंग करण्यास मनाई केली. पण आम्ही शूटिंग करणारच आणि हे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू असं प्रवासी म्हणाले. त्यावर वैमानिकाने धमकी दिली.  जर सोशल मीडियात फोटो शेअर केले तर विमान क्रॅश करेल अशी धमकी वैमानिकाने दिली असा दावा प्रवाशाने केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. वैमानिकाने दिलेल्या धमकीबाबत त्या प्रवाशांनी विमानातील इतर प्रवाशांना सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी विमानातील वैमानिकासह सर्व कर्मचारी बदलण्याची मागणी केली, पण त्यांची मागणी मान्य न करता वैमानिक बदलला जाणार नाही असं गो-एअरने स्पष्ट केलं. अखेरीस 185 प्रवासी असलेल्या या विमानातील तीन प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत या वैमानिकासह प्रवास करणार नाही असं म्हणत विमानातून काढता पाय घेतला. त्यामुळे शेवटी 182 प्रवाशांना घेऊन या विमानाने सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण घेतलं आणि 11 वाजून 20 मिनिटांनी हे विमान बंगळुरूत दाखल झालं. पण, दुसरीकडे गो-एअरकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. वैमानिकाला उशीर होण्यामागे प्रशासकीय कारण असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.    

टॅग्स :GoAirगो-एअरNew Delhiनवी दिल्लीpilotवैमानिक