शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 22:33 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे.

गोव्यातील पणजी येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्निकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण दुर्घटनेत 25 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 पर्यटक आणि 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 7 जणांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. याशिवाय 6 जखमींवर रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे.

महत्वाचे म्हणजे, या नाइट क्लबमधून बाहेर पडण्यासाठी केवळ दोनच गेट होते. यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, ही आग तेथील फर्नीचरमुळे अधिकच वेगाने पसरली. विशेष म्हणजे, लोकांना काही समजण्याच्या आतच ही आग संपूर्ण क्लबमध्ये पसली. 

काय म्हणाले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत? -या दुर्घटनेसंदर्भात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, नाइटक्लबमध्ये लागलेली भीषण आग सिलिंडर स्फोटमुळे नाही, तर क्लबमध्ये उडवल्या जाणाऱ्या इंटर्नल फायरवर्क्समुळे भडकली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी दंडाधिकारी चौकशी (मजिस्ट्रियल इनक्वायरी) आणि एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. तपासातील प्राथमिक संकेतांनुसार, फटाक्यांमुळे आग लागल्याचे आणि क्लबमधील अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

चार व्यवस्थापकांना अटक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोदक, महाव्यवस्थापक विवेक सिंह, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक रियांशु ठाकुर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरोधात निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

सावंत यांनी पोलीस महासंचालक आलोक कुमार यांना या प्रकरणात कोणतीही हयगय न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन होऊनही क्लबला काम करण्याची परवानगी दिली, त्यांनाही त्वरित निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

विशेष समिती स्थापन -राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कँडावेलू आणि डीजीपी यांना दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भीषण दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, अग्निशमन सेवा उपसंचालक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती एका आठवड्यात आपला अहवाल सादर करेल.

मुख्यमंत्री सावंत यांनी पीडितांना मदत जाहीर केली असून, प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना ₹5 लाख आणि जखमींना ₹50 हजार रुपयांची मदत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निधीतून दिली जाईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa club fire: Two exits, panic fueled rapid blaze, fatalities.

Web Summary : A fire at a Goa nightclub killed 25. Limited exits and flammable materials exacerbated the tragedy. Investigation underway, compensation announced for victims' families. Officials face scrutiny.
टॅग्स :goaगोवाfireआगPramod Sawantप्रमोद सावंतDeathमृत्यू