शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यात लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी सक्तीची होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 13:02 IST

युनायटेड नेशन्स प्रोग्रॅमची राज्य सरकारच्या प्रस्तावावर टीका

ठळक मुद्देलग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी सक्तीची करण्याचा गोवा सरकारचा विचारसरकारचा प्रस्ताव चुकीचा; युनायटेड नेशन्स प्रोग्रॅमचं मतअनेकजण न्यायालयात जाण्याची शक्यता

पणजी : एचआयव्हीच्या दृष्टीकोनातून विवाहापूर्वी रक्त चाचणी सक्तीची करावी असा विचार आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बोलून दाखवला व त्यासाठी कायदा दुरुस्तीचाही संकल्प सोडला तरी, हा प्रस्ताव पुढे जाण्याची शक्यता अनेकांना कमीच वाटू लागली आहे. एचआयव्ही व एड्सशी संबंधित युनायटेड नेशन्स प्रोग्रॅम या जागतिक संस्थेने गोवा सरकारचा प्रस्ताव चुकीचा असल्याची टिप्पणी केली आहे. राष्ट्रीय कायद्याच्या विरोधात गोवा सरकार जाऊ शकत नाही, अशीही भूमिका या संस्थेने मांडली आहे.आरोग्य मंत्री राणे यांना वाटते की, गोव्यात विवाहाची नोंदणी करण्यासाठी तरुण-तरुणी येतात तेव्हा एचआयव्ही चाचणीचे प्रमाणपत्र अशा अविवाहितांकडून मागितले जावे. एचआयव्हीच्या दृष्टीकोनातून चाचणी करून घेणे सक्तीचे करावे. याशिवाय विवाह नोंदणीवेळी तशा प्रमाणपत्राची सक्ती करावी. मात्र मंत्री राणे यांचा हा प्रस्ताव कायद्याच्या चौकटीत बसण्याची शक्यता दिसत नाही. विवाहपूर्व रक्त चाचणी सक्तीची करण्याचा प्रयत्न गोव्यात यापूर्वीही काही आरोग्य मंत्र्यांनी काही वर्षापूर्वी करून पाहिला होता. पण त्यात यश आले नव्हते.मंत्री राणे म्हणतात की, गोवा सरकारच्या कायदा अधिकाऱ्यांचे पथक सध्या प्रस्तावाचा अभ्यास करत आहे. विवाहापूर्व रक्त चाचणी सक्तीची करण्यासाठी आम्ही कायद्यात दुरुस्ती करू. कारण गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन राज्य आहे. गोव्याच्या किनारी भागांमध्ये अनेक एचआयव्हीग्रस्त व्यक्ती सापडतात. एचआयव्हीचा फैलाव रोखायचा आहे. लहान मुलांना एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून विवाहपूर्व चाचणी सक्तीची करणे योग्य ठरेल. मात्र एड्सशी संबंधित युनायटेड नेशन्स प्रोग्रॅम या जागतिक संस्थेने गोवा सरकार असे पाऊल उचलू शकत नाही, असा इशारा दिला आहे. एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त आणि अन्य समाजामध्ये भेदभाव करता येत नाही. जगाने मान्य केलेले हे तत्त्व आहे. राष्ट्रीय कायद्याच्या विरोधात गोवा सरकारने जाऊही नये, असे संस्थेचे म्हणणे आहे. विवाहापूर्वी रक्त चाचणी सक्तीची करण्याच्या गोवा सरकारच्या प्रस्तावाला काहीजण न्यायालयातही आव्हान देऊ शकतात, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :HIV-AIDSएड्स