शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
7
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
8
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
9
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
10
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
11
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
12
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
13
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
14
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
15
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
16
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
17
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
19
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
20
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
Daily Top 2Weekly Top 5

गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 21:26 IST

२५ बळींचे आरोपी घटनेनंतर ५ तासांत थायलंडला पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांकडून इंटरपोलची मदत घेतली जात आहे.

Goa Club Fire: गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. नाईट क्लबचे मुख्य आरोपी आणि मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे घटनेनंतर अवघ्या पाच तासांतच देश सोडून थायलंडमधील फुकेत शहरात पसार झाल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. आता गोवा पोलिसांनी या दोन्ही फरार आरोपींना पकडण्यासाठी इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत मागितली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, ही भीषण दुर्घटना ६  डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. आरोपींनी चौकशी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी तातडीने देशाबाहेर पळण्याचा कट रचला होता. मुंबई इमिग्रेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी ७ डिसेंबरच्या सकाळी ५:३० वाजता इंडिगोच्या विमानाने फुकेतसाठी रवाना झाले होते. एफआयआर नोंदवल्यानंतर गोवा पोलिसांचे पथक तात्काळ दिल्लीला रवाना झाले होते, पण आरोपी त्यांच्या ठिकाणांवर उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर कायद्यानुसार नोटीस लावण्यात आली.

इंटरपोलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध

गोवा पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींवर पकड घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी ७ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत दोन्ही आरोपींविरुद्ध एलओसी जारी केले होते, पण तोपर्यंत आरोपी देश सोडून पसार झाले होते. गोवा पोलिसांनी आता आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी संपर्क साधला आहे. आरोपी थायलंडमध्ये लपून बसले असल्याची पोलिसांना शंका आहे.

एका आरोपीला अटक

या प्रकरणातील अन्य एक आरोपी भारत कोहली याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले जात आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व २५ लोकांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून, मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Fire: Accused Fled to Phuket Before Police Arrived

Web Summary : Goa club fire accused, Gaurav and Saurabh Luthra, fled to Phuket within five hours of the incident. Police seek Interpol's help. Another accused, Bharat Kohli, arrested in Delhi. 25 died in the tragic fire.
टॅग्स :goaगोवाfireआग