शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:07 IST

Goa Club Fire Luthra Brothers: २५ बळींच्या घटनेनंतर फरार झालेले लूथरा बंधू थायलंडमध्ये अटक टाळण्यासाठी कोर्टात. 'आग लागण्यापूर्वीच बाहेर गेलो' असा वकिलांचा युक्तिवाद. भारत-थायलंड प्रत्यार्पण संधिचा धोका.

गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाइटक्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ लोकांचा बळी घेतल्यानंतर फरार झालेले क्लबचे मुख्य मालक सौरभ आणि गौरव लूथरा यांनी थायलंडमधून अटकेपासून वाचण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत  या दोघांनी 'अटकपूर्व जामीन याचिका' दाखल केली असून, अटक झाल्यास तातडीने भारत परतण्यास नकार दिला आहे.

प्रशासनाकडून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. आम्ही दिल्लीतून काम पाहतो. क्लबचा दैनंदिन कारभार ऑन-ग्राउंड मॅनेजर आणि रेस्टॉरंट मॅनेजर पाहतात. क्लबला ७ डिसेंबर रोजी आग लागली. मात्र, लूथरा बंधू ६ डिसेंबर रोजीच व्यावसायिक भेटीसाठी आणि संभाव्य रेस्टॉरंट ठिकाणे पाहण्यासाठी थायलंडला गेले होते. ते नेहमीच देश-विदेशात कमी वेळेत प्रवासाला जातात, असे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले.

क्लबला आग लागल्यानंतर काही तासांतच लूथरा बंधू भारत सोडून थायलंडला पळून गेले होते. यानंतर त्यांच्याविरुद्ध इंटरपोलने 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केली आहे. लूथरा बंधूंच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ लूथरा आणि तनवीर अहमद मीर यांनी कोर्टाला सांगितले की, "आमच्या अशिलास भारतात परतल्यावर अटकेची भीती असल्याने त्यांना सुरक्षा हवी आहे."

भारत-थायलंड प्रत्यार्पण संधी भारत आणि थायलंडमध्ये १९८२ पासून प्रत्यार्पण व्यवस्था आहे, जी २०१३ मध्ये अधिकृत करार म्हणून मजबूत करण्यात आली. २९ जून २०१५ पासून ही संधी अंमलात आहे. यामुळे दहशतवाद, आर्थिक गुन्हे किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हे केलेल्या व्यक्तींना दोन्ही देश एकमेकांच्या स्वाधीन करू शकतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Club Fire: Luthra Brothers Seek Court Protection from Thailand Extradition

Web Summary : Luthra brothers, owners of the Goa nightclub where a fire killed 25, seek anticipatory bail fearing arrest upon return from Thailand. They claim innocence, citing a prior business trip and fear of unfair persecution, fighting extradition with legal maneuvers.
टॅग्स :goaगोवाfireआगThailandथायलंड