शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जी मेलमध्ये बिघाड, लोकांचा खोळंबा, सोशल मीडियावर संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:48 IST

गुगल ड्राईव्ह आदी सेवाही चालत नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे कामकाजही खोळंबले.

नवी दिल्ली : गुगलच्या जी मेल यंत्रणेत जगभरात गुरुवारी दोन तास बिघाड झाला होता. त्यामुळे भारत, अमेरिका, युरोपीय देशांसह सुमारे ४२ देशांतील अब्जावधी लोकांची खूप पंचाईत झाली. ई-मेलद्वारे कोणत्याही अटॅचमेंट पाठविण्यास खूप उशीर लागत होता. त्यातच गुगल ड्राईव्ह आदी सेवाही चालत नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे कामकाजही खोळंबले.गुगलच्या कोणत्याच यंत्रणा चालत नसल्याने हताश झालेल्या नेटकऱ्यांनी त्यासंदर्भात सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली. मात्र, काही नेटकऱ्यांनी जी मेलच्या यंत्रणेत कोणताही बिघाड झाला नसल्याचा दावा केला.कोरोना साथीच्या काळात बहुतांश कार्यालयातील कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचे सारे कामकाज इंटरनेट सेवा तसेच ई-मेल यंत्रणा व्यवस्थित सुरू असण्यावर अवलंबून आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून जी-मेल सुमारे दोन तास चालत नसल्याने असंख्य लोकांच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले.काही वापरकर्त्यांच्या मते गुगल ड्राइव्हवरून फाइल अपलोड करता येणे कठीण बनले होते.गुगलच्या यंत्रणेत नेमका काय बिघाड झाला याबद्दल आमचे तज्ज्ञ शोध घेत आहेत. यंत्रणेत जो काही दोष निर्माण झाला असेल तो लवकरच दुुरुस्त केला जाईल, असे गुगलने म्हटले होते.>अ‍ॅटॅचमेंट अपलोड होण्यातही अडचणीजी मेल नीट चालत नसल्याने अनेकांच्या फाईल नीट अपलोड होऊ शकल्या नाहीत. मेलला अटॅचमेंट जोडली जाण्यास खूप वेळ लागत होता. तसेच जी मेलला लॉग इन होणे किंवा तेथून ई-मेल पाठविणे हीदेखील कामे करता येत नसल्याने वापरकर्ते निराश झाले होते. सकाळी कामाची सुरुवात असल्याने आलेली सर्व ई-मेल वाचली जातात. त्यापैकी कोणाला लगेचच उत्तर द्यायचे हे ठरविले जात. सुमारे दोन तास जी-मेल बंद असल्याने कामे खोळंबली होती.या बिघाडाचा तडाखा फिलिपिन्स, न्यूझीलंडसह अन्य ४२ देशांना बसला आहे, असे या समस्येचा वेध घेणाºया ट्रॅकिंग वेबसाईटने म्हटले आहे.