शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'राम'नामाचा महिमा! राजस्थानमधील निवडणुकीत तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:29 IST

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्येही राम नामाची चलती असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देअयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यापासून राजकीय वर्तुळात राम नामाचा जप सुरू झाला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्येही राम नामाची चलती असल्याचे समोर आले आहे. 7 डिसेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांपैकी तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम असल्याचे समोर आले आहे. 

जयपूर - नावात काय आहे? असे शेक्सपिअरने म्हटले होते. मात्र भारतीय राजकारणात 'राम'नामाचा लाभ राजकारण्यांनी बऱ्यापैकी उचलला आहे. आता अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यापासून राजकीय वर्तुळात राम नामाचा जप सुरू झाला आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्येही राम नामाची चलती असल्याचे समोर आले आहे.  7 डिसेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांपैकी तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम असल्याचे समोर आले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात जरी राज्याच्या विकासाच्या मुद्य्यावरून झाली असली तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राम आणि हिंदुत्व हेच विषय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भाषणामध्ये प्रामुख्याने दिसत आहेत. दरम्यान राज्यातील 200 विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वपक्षीय आणि अपक्ष उमेदवारांची गोळाबेरीज केली असता तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम हे नाम आहे. नेहमी रामनामाचा जप करणाऱ्या भाजपाने नावात राम असलेल्या उमेदवारांमध्येही बाजी मारली आहे. भाजपाच्या एकूण उमेदवारांपैकी 30 उमेदवारांच्या नावात राम आहे. तर काँग्रेसच्या 23 उमेदवारांच्या नावात राम आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षानेही राम नाव असलेल्या 27 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. तर 107 अपक्ष उमेदवारांच्या नावातही राम आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 11 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.    

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकPoliticsराजकारण