शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

'जन गन मन'सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्या !

By admin | Updated: November 17, 2016 17:36 IST

भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्या

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्यावा, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्या, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असल्याचंही यावेळी न्यायालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, याचिकेवर मुख्य न्यायाधीश जी रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली आहे. या याचिकेवर केंद्र सरकारनं 8 फेब्रुवारी 2017पर्यंत मत नोंदवावं, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. दिल्लीतले स्थानिक रहिवासी असलेले गौतम आर. मोरारका यांनी भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्यावा, यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.मोरारका यांच्या मते, 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला देऊन त्याचाही सन्मान करायला हवा. अनेक जण वंदे मातरम हे राष्ट्रगीताबाबत अनादर व्यक्त करतात. त्यामुळे त्याला राष्ट्रगीतासारखा समान दर्जा देण्याची गरज आहे.1950मध्ये राष्ट्रपतींनीही 'वंदे मातरम'चा 'जन गन मन'सारखा आदर राखावा, असं म्हटलं होतं. याचीही आठवण मोरारका यांनी करून दिली आहे.