शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर तरी सन्मान द्या, तमाशा बंद करून न्याय द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 05:51 IST

आयपीएस अधिकारी आत्महत्येप्रकरणी राहुल गांधी यांची मागणी, दोषींना पकडण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

चंडिगड : हरयाणातील आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांच्या आत्महत्येला जे दोषी असतील त्यांना त्वरित पकडावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. या प्रकरणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे व दोषींना पकडून द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. 

मंगळवारी राहुल गांधी यांनी पुरन कुमार यांच्या पत्नी आयएएस अधिकारी अमनीत कुमार व त्यांच्या दोन मुलींची तासभर भेट घेतली. गेली अनेक वर्षे मागासवर्गीय अधिकाऱ्यांशी पद्धतशीर भेदभाव केला जातो. त्यांचा मानसिक छळ केला जातो. सार्वजनिकरीत्या त्यांना अपमानित केले जाते, त्यांच्यावर अत्याचार केला जातो असे पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले. पुरन कुमार यांच्यावर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. त्यांच्या कुटुंबावरचा दबाव आता बंद करा. कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करा, त्यांना मृत्यूनंतर तरी सन्मान द्या, हा तमाशा बंद करा, अशी मागणी केली आहे. 

डीजीपी सक्तीच्या रजेवरपुरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणावरून सोमवारी हरयाणा सरकारने पोलिस महासंचालक शत्रूजीत कपूर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. सरकारने याआधी रोहतकचे जिल्हा पोलिस प्रमुख नरेंद्र बिजारनिया यांचीही बदली केली होती. मात्र, त्यांची अन्य कुठे नियुक्ती केली नव्हती. 

पुरन कुमारांवर आरोप, पोलिसाची आत्महत्यापुरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत हरयाणा पोलिस दलातील संदीप कुमार या असिस्टंट सब-इन्स्पेक्टरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. तत्पूर्वी लिहिलेल्या व्हिडिओ व चिठ्ठीत त्यांनी आरोप केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Give respect in death, stop the spectacle, deliver justice!

Web Summary : Rahul Gandhi demands justice in IPS officer Puran Kumar's suicide case, alleging discrimination. DGP sent on leave after corruption allegations. Investigation urged.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी