शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: आजवर कोरोना बाधित न झालेल्यांसाठी महत्वाचे; तज्ज्ञांनी सांगितले, एकतरी लस द्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 08:23 IST

corona virus vaccination: जी स्थिती पुण्याची आहे, तीच दिल्लीची असल्याची दिसत आहे. पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्ह्वेमध्ये ८० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्याचे दिसले आहे.

दिल्लीमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे. अन्य राज्यांचीही तशीच काहीसी परिस्थिती आहे. परंतू तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना आजवर कोरोना (corona virus) झालेला नाही, त्यांनी या काळात कोरोना लसीकरण (corona vaccination) करून घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (who has not infected yet, gave them corona vaccine.)

आजवर ज्या लोकांनी कोरोनाला लांब ठेवले आहे, म्हणजेच कोरोना अद्याप झालेला नाहीय त्यांना कमीत कमी एक डोस तरी द्यावा असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तेव्हाच दिल्लीतील भविष्यातील परिस्थिती नियंत्रणात राहू शकते असे त्यांनी म्हटले आहे. सफदरजंग हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिनचे एचओडी डॉ. जुगल यांनी सांगितले, जी स्थिती पुण्याची आहे, तीच दिल्लीची असल्याची दिसत आहे. पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्ह्वेमध्ये ८० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्याचे दिसले आहे. अशीच परिस्थिती दिल्लीत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, १० ते २० टक्के लोकसंख्या अशी आहे की ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. या लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात यावी.

धर्मशिला कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर अंशुमान कुमार यांनी सांगितले की, कोरोना सध्या शांत आहे. सर्वांना आताच कोरोना लस मिळायला हवी. जुलैचा पूर्ण महिना हातात आहे, या काळात आपण जर अधिकाधिक लोकांना लस दिली तर पुढील काळात लवकरात लवकर कोरोनाचा विस्तार कमी करण्यात यशस्वी होऊ शकतो. कुमारने सांगितले, ज्या प्रकारे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंटचा संक्रमण दर पहायला मिळाला आहे, तो त्रास देऊ शकतो. यामुळे आपल्याला लवकरात लवकर कोरोना न झालेल्या लोकांना कमीत कमी एक तरी लसीचा डोस द्यावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस