शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्य द्या अन्यथा मंत्रिमंडळातून डच्चू, काँग्रेसची नेत्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:28 IST

लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे.

अमृतसर - लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी पंजाब कॅबिनेटमधील मंत्र्यांना, नेत्यांना आणि आमदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याचं सांगितलं आहे. जर तसं झालं नाही तर त्या नेत्याचे मंत्रीपद काढून घेतलं जाईल असा इशाराच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिला आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कडक शब्दात हा इशारा काँग्रेस पक्षातील मंत्री आणि आमदारांना दिला आहे. त्यामुळे जर या नेत्यांनी ज्या जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे अशाठिकाणी  मताधिक्य मिळालं नाही तर ते नेते मंत्रीपद गमावू शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस नेत्यांना मोठं आव्हान असणार आहे त्यावर भविष्यातील त्यांचे मंत्रीपद पणाला लागलं आहे. तसेच काँग्रेस आमदारांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले आहे की, आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे. जर मतदान कमी झालं तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यामुळे काँग्रेस आमदारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असणार आहे.  

दरम्यान त्याचसोबत पक्षात फक्त ज्येष्ठ असून चालणार नाही तर लोकसभा निवडणुकीत नेत्यांची कामगिरी पक्षातील त्यांचे भवितव्य ठरवणारी आहे. नेत्यांच्या कामगिरीवर पक्षामध्ये पद आणि सरकारमध्ये मंत्रीपद दिलं जाईल. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अशाप्रकारे नेत्यांना दिलेलं आव्हान म्हणजे पक्षात परफॉर्मेस बेस्ड कल्चरला चालना देण्यासाठी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.   

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रत्येक जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र देशातील सत्ता कोणाला द्यायची हे जनतेने दिलेल्या मतदानावर अवलंबून आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कामगिरी कोणता पक्ष चांगला करतो हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस