शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

जेनेरिक औषधेच द्या!

By admin | Published: April 23, 2017 3:24 AM

रुग्णांना बाहेरून आणायची औषधे लिहून देताना ब्रँडेड नावे न लिहिता औषधांची फक्त जेनेरिक नावेच लिहून द्यावीत आणि औषधाची चिठ्ठी सुवाच्य अक्षरात लिहावी

नवी दिल्ली : रुग्णांना बाहेरून आणायची औषधे लिहून देताना ब्रँडेड नावे न लिहिता औषधांची फक्त जेनेरिक नावेच लिहून द्यावीत आणि औषधाची चिठ्ठी सुवाच्य अक्षरात लिहावी, असे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने देशभरातील सर्व डॉक्टरांना सांगितले असून, याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वी सूरतमध्ये एका इस्पितळाचे उद््घाटन करताना डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत यासाठी सरकार कडक नियम करेल, असे सूतोवाच केले होते. डॉक्टर गिचमिड अक्षरात जे लिहून देतात ते रुग्णांना वाचता येत नाही; परिणामी खासगी मेडिकल स्टोअर्समधून गरिबांच्या हाती महागडी ब्रँडेड औषधे सोपविली जातात, असेही मोदी म्हणाले होते. मोदींचा हा इशारा लक्षात घेऊन डॉक्टरी व्यवसायाचे नियमन करणाऱ्या मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया या शीर्षस्थ संस्थेने यासंदर्भात गेल्या वर्षी दिलेल्या निर्देशांचे स्मरण देत नवे परिपत्रक जारी केले आहे. गेल्या वर्षी मेडिकल कौन्सिलने डॉक्टरांसाठी आचारसंहितेमधील कलम १.५मध्ये सुधारणा करून डॉक्टरांनी ब्रँडेड औषधांऐवजी फक्त जेनेरिक औषधेच लिहून देणे बंधनकारक केले होते. कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या देशभरातील सर्व डॉक्टरांनी याचे कसोशीने पालन करावे, असे नवे परिपत्रक सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना, सर्व सार्वजनिक इस्पितळांच्या संचालकांना व सर्व राज्यांच्या मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. डॉक्टरांनी तर्कसंगत औषधे लिहून द्यावीत व निष्कारण अव्वाच्या सव्वा औषधे लिहून देण्याचे टाळावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, आवश्यक औषधे रास्त भावाने उपलब्ध करून देण्याच्या ‘जनऔषधी’ कार्यक्रमाखाली सरकार अशा दुकानांची संख्या वाढवत आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय सूचीतही आणखी औषधांचा समावेश केला जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)उपाय सर्वंकष नाही; केवळ अ‍ॅलोपथीसाठीच मेडिकल कौन्सिलचा हा फतवा त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या आंग्लवैद्यकाच्या (एमबीबीएस, एम.डी., एम.एस.ई.) डॉक्टरांनाच लागू आहे. प्रत्यक्षात आयुर्वेद आणि युनानी वैद्यकाची पदवी (बीएएमएस, बीयूएमएस) असलेले डॉक्टरही सर्रास अ‍ॅलोपथीची औषधे लिहून देतात, असा गावोगावचा अनुभव आहे. मेडिकल कौन्सिलचे बंधन अशा डॉक्टरांवर असणार नाही. त्यामुळे या अन्य वैद्यक शाखांच्या कौन्सिल त्यांच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपथीची औषधे देण्यास मज्जाव करणार नाहीत तोपर्यंत रुग्णहितासाठी उचलले जात असलेले हे पाऊल सर्वंकश आणि परिणामकारक ठरणार नाही.