शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट देता की, जाऊ दुसऱ्या पक्षात? बंडखाेरीवर वरिष्ठांकडून तोडग्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 06:45 IST

कर्नाटकात १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन याद्यांमध्ये २१२ उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात बंडखोरीचे लोण सुरू झाले आहे.

बंगळुरू :

कर्नाटकात १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन याद्यांमध्ये २१२ उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात बंडखोरीचे लोण सुरू झाले आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काही नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत, तर काहींनी अन्य पक्षातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ही असंतोषाची ठिणगी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर भाजपने मंगळवारी १८९ उमेदवारांची पहिली आणि बुधवारी रात्री २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. राज्यात विधानसभेच्या एकूण २२४ जागा आहेत. पक्षाने अद्याप १२ जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

मुदिगेरेचे तीन वेळा आमदार राहिलेल्या  एम पी कुमारस्वामी आणि हावेरीचे आमदार नेहरू ओळेकर यांनी गुरुवारी तिकीट नाकारल्यानंतर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला. भाजपने तिकीट नाकारल्याबद्दल कुमारस्वामी यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांच्यावर आरोप केले. पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ओळेकर यांनी समर्थकांसह रस्त्यावर निदर्शनेही केली.

हजारो कार्यकर्ते राजीनामा देणार-हजारो भाजप कार्यकर्ते पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचा दावा ओळेकर यांनी केला. - पक्षातील या गदारोळावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, “तिकीट मिळण्याच्या आशेने काही नेते आणि आमदारांनी राजीनामे जाहीर केले आहेत. काहींनी राजीनामेही दिले आहेत. - आम्ही कार्यकर्ते आणि नेत्यांशी बोलत असून, सर्व गोष्टी मार्गी लागतील. मी वरिष्ठांशी बोलतोय, आमचे हायकमांड त्यांच्याशी बोलेल. मला खात्री आहे की गोष्टी सुटतील.

मुस्लिमांचे आरक्षण काढून घेणे चुकीचे : कोर्टसरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वोक्कालिगा आणि लिंगायत समाजासाठी आरक्षणात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा आणि मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय प्रथमदृष्ट्या दोषपूर्ण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे.