शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Gita Gopinath Meets Pm Narendra Modi : कोरोना लस न्याय्य प्रमाणात उपलब्ध नाही : अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 11:46 IST

Gita Gopinath Meets Pm Narendra Modi : गरीब देशांसाठी उत्पादक, विकसित देशांनी पुढाकार घेण्याची गरज

Gita Gopinath Meets Pm Narendra Modi : जगात लस न्याय्य प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा धोका अधिक गंभीर झाला आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) भारतीय-अमेरिकन मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले. 

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोपीनाथ यांनी लस उत्पादक आणि विकसित देशांनी ज्या गरीब देशांना लस गरजेची आहे त्यांना लवकरात लवकर ती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यावर भर दिला. लसीची उपलब्धता अन्यायकारक आहे. वर्ष २०२१ आता संपण्याच्या टप्प्यावर असून, उच्च उत्पन्नाच्या देशांनी त्यांच्या लोकसंख्येपैकी ७० टक्क्यांचे लसीकरण केले आहे आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये चार टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झाले आहे. २०२१च्या अखेरपर्यंत प्रत्येक देशातील ४० टक्के लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य होते. ८० देशांनी हे लक्ष्य गाठलेले नाही. बहुसंख्य देशांकडे पुरेशा प्रमाणात लस नाही,’ असे गीता गोपीनाथ म्हणाल्या. 

गोपीनाथ - मोदी यांची भेटगीता गोपीनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गोपीनाथ या पहिल्या उपमहासंचालक म्हणून असतील, असे जाहीर केल्यावर ही भेट झाली. गोपीनाथ या जिओफ्रे ओकामोटा यांच्या जागी येतील. गोपीनाथ यांनी आयएमएफच्या मुख्य अर्थशास्रज्ञ म्हणून ३ वर्षे काम केलेले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस