शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक घेणाऱ्यांमध्ये मुलींना आहे अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:00 IST

सहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते. देशभरातील दत्तक व्यवहारांचे नियमन करणा-या ‘चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रीसोर्स अ‍ॅथॉरिटी’ने (सीएआरए) दिलेल्या माहितीनुसार सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत देशात एकूण ३,२७६ मुलांना दत्तक घेतले गेले. त्यात १,८५८ मुली तर १,४१८ मुले होती.

नवी दिल्ली -  सहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते. देशभरातील दत्तक व्यवहारांचे नियमन करणा-या ‘चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रीसोर्स अ‍ॅथॉरिटी’ने (सीएआरए) दिलेल्या माहितीनुसार सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत देशात एकूण ३,२७६ मुलांना दत्तक घेतले गेले. त्यात १,८५८ मुली तर १,४१८ मुले होती.मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहिले. महाराष्ट्रात एकूण ६४२ मुले दत्तक घेतली गेली त्यापैकी ३५३ मुली होत्या. मुलींना दत्तक घेण्यामध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक व पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. सहा वर्षांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता असे दिसते की, सरासरी ५९.७७ दाम्पत्यांनीमुलगी दत्तक घेणे पसंत केले.तर मुलगा दत्तक घेणाºयांचेसरकारी प्रमाण ४०.२३ टक्के राहिले. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर व्यस्त आहे अशा हरियाणा व उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्येही मुली दत्तक घेण्याकडे कल दिसून आला.निराधार म्हणून सोडून दिल्या जाणाºया अर्भकांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दत्तक घेतल्या जाणाºयाही मुलीच जास्त असतात, असा एक सर्वसाधारण समज आहे.मात्र ‘सीएआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्ट. कर्नल दीपक कुमार यांनी याचा ठाम इन्कार करताना सांगितले की, मुल दत्तकघेऊ इच्छिणाºया पालकांना आम्ही त्यांची पसंती आधीच कळविण्याचा नेहमीच पर्याय देतो. मुलाला पसंती देणे, मुलीला पसंती देणे किंवा कोणताही पसंती न देणे असे तीन पर्याय त्यांना दिले जातात. यानुसार जे खास करून मुलींसाठीच पसंती देतात अशा दाम्पत्यांचे प्रमाण ५५.४ टक्के दिसून येते.अपंग, मोठी मुले नकोशीअपंगत्वामुळे विशेष गरजा असलेली मुले दत्तक घेण्यात आपल्याकडे फारसा कल दिसून येत नाही.पाश्चात्य देशांमध्ये उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने व सरकारही बरीच आर्थिक मदत देत असल्याने अशा मुलांना दत्तक घेण्यास लोक तयार होतात, असे लेफ्ट. कर्नल दीपक कुमार म्हणाले.आपल्याकडे चार ते सहा वर्षांहून अधिक मोठे असलेले मूल दत्तक घेण्यास फारसे कोणी तयार होत नाही. परिणामी अनाथ मुलांचे वय एकदा पाच-सहा वर्षांच्या पुढे गेले की त्यांना दत्तक पालक मिळण्याची शक्यता खूपच कमी होते.देशाबाहेर दत्तक घेतल्या जाणाºया मुलांमध्येही दिसते. परदेशात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांची संख्या सन २०१६-१७ मध्ये ५७८ होती ती यंदाच्या वर्षी वाढून ६५१ झाली.

टॅग्स :Familyपरिवारnewsबातम्या