शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 09:22 IST

एका तरुणाचं गावातीलच एका मुलीवर प्रेम जडलं होतं. दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला अन्...

प्रेमासाठी माणूस अगदी काहीही करायला तयार असतो. वेळेप्रसंगी अगदी सगळे धोके जाणून देखील आपल्या प्रिय व्यक्तीची भेट घेण्याचे धाडस काही लोक करतात. पण, असंच धाडस करणाऱ्या एका तरुणाला आता फार महागात पडलं आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील हायाघाट पोलीस ठाण्याच्या बिलासपूर गावातील ही घटना आहे. एका तरुणाचं गावातीलच एका मुलीवर प्रेम जडलं होतं. दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि १ जुलै रोजी दोघेही घरातून निघाले. पण दोन दिवसांनी म्हणजेच ३ जुलै रोजी ते परत आले.

प्रेमामुळे तरुणाला "तालिबानी" शिक्षा!जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना हे प्रेमसंबंध कळाले, तेव्हा त्यांनी संतापात त्या तरुणाला अमानवी वागणूक दिली. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही लोक त्या तरुणाचे केस कापताना आणि त्याच्या चेहऱ्यावर काळं फासताना दिसले होते. घडल्या प्रकारामुळे तरुण खूप घाबरला होता. त्याला खूप मारहाणही करण्यात आली होती.

दोघे वेगवेगळ्या धर्माचेपोलिसांच्या चौकशीत समजले की, त्या तरुण आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते आणि दोघे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी रागातून त्या तरुणाला गावातच सर्वांसमोर शिक्षा दिली.

पोलिसांची कारवाईदरभंगा सदरचे एसडीपीओ राजीव कुमार यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओबाबत चौकशी केली असता, ही घटना बिलासपूर गावात घडल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी व्हिडीओची सत्यता तपासून मुलीच्या भावाला अटक केली आहे. तरुण आणि तरुणी दोघेही प्रौढ आहेत आणि सध्या पोलिसांच्या संरक्षणात आहेत. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश