शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बाबो! प्रियकरासोबत राहण्यासाठी प्रेयसीनं सोडलं घर, गाठलं क्वारंटिन सेंटर; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 18:49 IST

CoronaVirus News: प्रेम संबंधांना कुटुंबियांचा विरोध; प्रेमी युगुलाचा क्वारंटिन केंद्रात मुक्काम

पूर्वी सिंहभूम: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. झारखंडच्या घाटशिलामधल्या नुतनडीहच्या क्वारंटिन केंद्रात सध्या याचीच प्रचिती येत आहे. या क्वारंटिन केंद्रात एका प्रेमी युगुलाला ठेवण्यात आलं आहे. हे दोघं दिवसभर एकमेकांना पाहत राहतात. प्रेमाच्या गोष्टी करतात. त्यांच्या शेजारी अनेक प्रवासी मजूर आहेत. मात्र त्यामुळे प्रेमी युगुलाला कोणतीही अडचण होत नाही. आंध्र प्रदेशमध्ये कामासाठी गेलेला प्रियकर माघारी परतला असून त्याला क्वारंटिन केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती प्रेयसीला मिळाली. गावात राहणाऱ्या प्रेयसीनं लगेचच क्वारंटिन केंद्र गाठलं. या दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांचं लग्न व्हावं, असं दोन्ही कुटुंबांना वाटत नाही. प्रेयसीच्या कुटुंबियांनी क्वारंटिन केंद्र गाठून दोघांनाही बरंच सुनावलं. त्यानंतर प्रेमी युगुल क्वारंटिन केंद्र सोडून पळून गेलं. मात्र दुसऱ्याच दिवशी ते परतलं. त्यानंतर ग्रामस्थांच्या सांगण्यावरून प्रेयसीलादेखील क्वारंटिन केंद्रात ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच घाटशिलाचे बीडीओ, एसडीओ आणि एसडीपीओ यांनी क्वारंटिन केंद्र गाठलं. त्यांनी प्रेमी युगुलाची माहिती घेतली. संपूर्ण प्रकरण क्वारंटिन केंद्राशी संबंधित असल्यानं परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आल्याचं बीडीओ संजय कुमार दास यांनी सांगितलं. नूतनडीह क्वारंटिन केंद्रात सध्या २२ जण आहेत. त्या सगळ्यांना होम क्वारंटिनमध्ये राहण्यास सांगितलं होतं. मात्र ग्रामस्थ गावात प्रवेश देत नसल्यानं मजुरांना क्वारंटिन केंद्रात ठेवण्याच आल्याची माहिती त्यांनी दिली.मूळचा नूतनडीहचा रहिवासी असलेला चंद्रमोहन हांसदा आणि त्याची प्रेयसी यांनी दोनच वर्षांपूर्वी गुपचूप लग्न केल्याची माहिती दास यांनी केलेल्या चौकशीतून पुढे आली. त्या दोघांना सोबत राहण्याची इच्छा आहे. मात्र कुटुंबीय तयार नाहीत. त्यामुळे सध्या ते क्वारंटिन केंद्रात एकत्र राहत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या