शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक करणारी ती तरूणी आता बनली जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 10:58 IST

श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे चर्चेत आलेली 23 वर्षीय खेळाडू अफ्शान आशिक आता जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन बनली आहे.

ठळक मुद्दे श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे चर्चेत आलेली 23 वर्षीय खेळाडू अफ्शान आशिक आता जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन बनली आहे. काही महिन्यांपूर्वी काश्मीरमधल्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या पोस्टरवर झळकलेली अफ्शानने मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

श्रीनगर- श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे चर्चेत आलेली 23 वर्षीय खेळाडू अफ्शान आशिक आता जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन बनली आहे. काही महिन्यांपूर्वी काश्मीरमधल्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या पोस्टरवर झळकलेली अफ्शानने मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांना राज्यातील खेळाडुंच्या समोर असणाऱ्या समस्यांचा माहिती दिली. तसंच त्या समस्यांचं निवारण करण्याची मागणीही केली. माझं आयुष्य नेहमीसाठी बददलं आहे. मला विजेती बनायचं आहे. राज्याला व देशाला गौरव मिळवून देण्यासाठी मला काहीतरी करायचं आहे.  आता मागे वळून पाहण्याची इच्छा नसल्याच्या भावना अफ्शान बोलून दाखविली. अफशाच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा बनविला जाणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक अफशावर सिनेमा बनवणार असल्याची चर्चा आहे. 

अफ्शानने मंगळवारी जम्मू-काश्मीर महिला फुटबॉल टीममधील इतर खेळाडुंसह गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनीचं टीमला भेटीचं निमंत्रण दिलं होतं. अर्धा तास चाललेल्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी म्हंटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये खेळांना प्रोत्साहन देऊन योग्य नियोजन केलं तर तेथिल तरूण दहशतवाद आणि इतर बेकायदेशीर कामांपासून दूर राहुन स्वतःमध्ये असलेले कलागुण विकसित करती, ज्यामुळे राज्याचं नावं मोठं होइल. जम्मू-काश्मीरमध्ये खेळासाठी योग्य नियोजन नाही, याबद्दल राजनाथ सिंह यांना सांगितल्यावर त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा आग्रह केला. पंतप्रधान विशेष पॅकेजच्या अंतर्गत सुरूवातील 100 कोटी रूपयांची योजना केली जाईल, असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिल्याचं अफ्शानने सांगितलं. 

श्रीनगरमध्ये राहणारी अफ्शानने सध्या मुंबईतील एका क्लबसाठी खेळते आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरFootballफुटबॉल