शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या बसमध्ये हस्तमैथून करणा-याला तरुणीने शिकवला धडा, व्हिडीओ रेकॉर्ड करुन केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 13:24 IST

दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली तरुणी बसमधून प्रवास करत असताना बाजूच्या सीटवर बसलेली एक व्यक्ती हस्तमैथून करत होता.

नवी दिल्ली - महिलांसोबत होणा-या अश्लील घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. काही दिवसांपुर्वी मुंबईत तरुणींसमोर हस्तमैथून करत असल्याची घटना समोर आल्यानंतर त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी अनेकांनी अशाप्रकारे अश्लील कृत्य करणा-यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र काही दिवस सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा शांत झाला होता. पण राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा अशी घटना समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीला या घटनेला सामोरं जावं लागलं आहे. 

दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली तरुणी बसमधून प्रवास करत असताना बाजूच्या सीटवर बसलेली एक व्यक्ती हस्तमैथून करत होता. यावेळी तरुणीने त्या व्यक्तीचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट करुन टाकला. तरुणीने वसंत विहार पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारदेखील दाखल केली आहे. 

पीडित तरुणीने घटनेबद्दल बोलताना सांगितलं की, 'गर्दीने खचाखच भरलेल्या बसमधून आपण प्रवास करत असताना आपल्या बाजूच्या सीटवर बसलेला व्यक्ती हस्तमैथून करत होता'. पुढे बोलताना तरुणीने सांगितलं की, 'मला आश्चर्याचा धक्का बसला, पण नंतर मी त्या व्यक्तीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. लोकांनाही या घटनेची माहिती मिळावी यासाठी मी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला'. 'लोक अशाप्रकारच्या घटनांना लैंगिक छळ मानत नाहीत', असंही पीडित तरुणीने म्हटलं आहे. 

सीएसएमटी स्थानकावरील घटना - सीएसटी स्थानकावर एका प्रवाशाने तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन केल्याची घटना घडली होती  ही घटना 8 जुलै रोजी घडली होती. 'तपोवन एक्स्प्रेस'मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. 29 जून रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सीएसटी स्थानकावर हा प्रकार घडला होता. 22 वर्षाची तरुणी कामानिमित्त नाशिकला निघाली होती. यावेळी सीएसटी स्थानकात आल्यावर ती प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या 'तपोवन एक्स्प्रेस'ने नाशिकला जाण्यासाठी निघाली. त्यानंतर स्थानकावर अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे बघून ट्रेनमध्ये थांबलेल्या अशोक प्रधान या विकृत तरुणाने तिच्याकडे पाहून हस्तमैथून करत असल्याचे दिसून आले होते. या प्रकारामुळे घाबरल्याने ती तरुणी दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्यासमोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लिल चाळे करू लागला. यावेळी तिने पुरावा म्हणून त्या विकृताचा व्हिडिओही काढला. त्यानंतर याची माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. दरम्यान, या झालेल्या प्रकाराबद्दल मीडियाने बातमी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अशोक प्रधान याला तब्बल दहा दिवसांनंतर अटक केली होती. 

पवईतही घडली अशीच घटनापवईमध्येही दुचाकीवरुन चाललेल्या एका तरुणाने 19 वर्षीय युवतीला आपल्या पँटची चेन खोलून दाखवली होती. पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून घरी परतत असताना पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती.