शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हायव्होल्टेज ड्रामा! "मरू पण साथ सोडणार नाही"; लग्नाच्या विधीदरम्यान नवरी प्रियकरासह पळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 15:38 IST

हळदी समारंभानंतर एका मुलीने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलं. मात्र त्यानंतर पोलीस आल्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. 

बिहारच्या जमुईमध्ये प्रेमप्रकरणासंबंधित एक घटना समोर आली आहे, जे समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. हळदी समारंभानंतर एका मुलीने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलं. मात्र त्यानंतर पोलीस आल्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तरुणाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी पोलिसांनाही संघर्ष करावा लागला. पोलीस जेव्हा त्या तरुणाची चौकशी करण्यासाठी पोहोचले तेव्हा तो प्रेयसीला मिठी मारून बसला होता. त्यामुळे त्याला नेणं पोलिसांसाठी अवघड काम होतं. मुलगा आणि मुलगी एकमेकांना सोडायला अजिबात  तयार नव्हते.

या घटनेबाबत सांगितलं जात आहे की, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती आणि विधीही सुरू झाले होते. घरातील सर्वजण लग्नाबद्दल खूप आनंदी होते. मात्र नंतर प्रियकराची एन्ट्री झाली आणि वातावरणचं बदललं. 

लग्नाच्या अवघ्या 8 दिवस अगोदर मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली आणि मंदिरात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. मुलगी घरी नसल्याचं पाहून घरच्यांना काळजी वाटली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, मुलगी तिच्या प्रियकरासोबत त्याच्या गावात राहत असल्याचं त्यांना समजलं. पोलीस जेव्हा मुलीच्या कुटुंबासह तेथे पोहोचले तेव्हा मुलगा आणि मुलगी एकमेकांना मिठी मारून बसले. ते वेगळे व्हायला तयार नव्हते.

पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला असता, तो जाण्यास तयार नव्हता आणि त्याने तरुणीला मिठी मारली. मरून जाऊ पण साथ सोडणार नाही असं हे दोघं बोलत होते. त्यांना वेगळं करण्यात पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. 

टॅग्स :marriageलग्न