शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमध्ये सीट मागणाऱ्या तरुणीला 'तो' म्हणाला,'घरी जाऊन एकमेकांच्या मांडीवर बसा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:54 IST

मित्रासोबत ट्रेनमधून प्रवास करताना सहप्रवाशांकडून मिळालेल्या गैरवर्तणुकीबाबतची तक्रार पीडित तरुणीनं पोलिसाकडे केली आहे व न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.    

कोलकाता - ट्रेनमधून प्रवास करताना गटबाजीचा, उर्मट, बेशिस्त प्रवाशांचा सामना प्रत्येकाला करावा लागतोच. चूक नसणाऱ्या व्यक्तीनं कितीही नरमाईनं घेण्याचा प्रयत्न केला तरीही समोरील उर्मट व्यक्तीला खोडी काढल्याशिवाय किंवा 'आम्हीच कसे बरोबर आहोत', हे दाखवल्याशिवाय चैन पडत नाही. असाच काहीसा लोकल प्रवासामधील धक्कादायक अनुभव पश्चिम बंगालमधील एका तरुणीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मित्रासोबत ट्रेनमधून प्रवास करताना सहप्रवाशांकडून मिळालेल्या गैरवर्तणुकीबाबतची तक्रार पीडित तरुणीनं पोलिसाकडे केली आहे व न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.    

नेमकी काय आहे घटना?खासगी कंपनीमध्ये काम करणारा 28 वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसोबत बराकपूरच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत होता. वर्दळ असलेल्या स्थानकाहून या दोघांनीही कृष्णानगर लोकल पकडली. लोकलमध्ये एकत्र बसायला जागा मिळावं, यासाठी त्यांना एका सहप्रवाशाला थोडेसे आतील बाजूस सरकण्याची विनंती केली. मात्र,यावर मला पंख्याची हवा लागणार नाही, असे म्हणत या उर्मट प्रवाशानं जागा करुन द्यायला नकार दिला. यानंतर आहे त्या जागेमध्ये तरुण-तरुणी बसले.

काही वेळानं लोकलमध्ये गर्दी आणखी वाढल्यानंतर अन्य प्रवाशांनीही गैरवर्तन केल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे. या पूर्ण घटनेचे चित्रण तरुणी आपल्या मोबाइलमध्ये करत व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रारदेखील केली. तरुणीनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नेहमीप्रमाणे मी सियालदाहहून लोकल पकडली. यावेळी बसायला जागा मिळावी, यासाठी आम्ही सहप्रवाशांना जागा करुन देण्याची विनंती केली. मात्र बसण्यासाठी जागा देण्यास त्यांनी नकार दिला. यातील एकानं पंख्याखालील जागा सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र काही वेळानंतर मला आणि माझ्या मित्राला बसण्यासाठी जागा मिळाली. यावेळीही काही प्रवाशांनी 'हा महिलांचा डबा नाहीय, महिला डब्यामध्ये जा', असे म्हणत आरडाओरडा करायला सुरुवात केली. प्रवाशांच्या त्रासाला कंटाळून आम्ही तीदेखील जागा सोडली. यानंतर पंखा हवा असणारा व्यक्ती आमच्याशेजारी येऊन बसला. 

त्यावेळी तरुणीनं त्यांना विचारलं की, 'काका, आता तुम्ही जागेवरुन का सरकलात? तुम्हाला आता गरम होत नाहीय का?. यावर त्या प्रवाशानं पुन्हा गैरवर्तन करत उद्धट उत्तर दिले की, 'घरी जा आणि एकमेकांच्या मांडीवर बसा!'. एवढंच नाही तर दुसऱ्या प्रवाशानं तरुणीला तिच्या कपड्यांवरही ऐकवलं. लोकल प्रवासादरम्यान असे कपडे घालून येऊ नकोस. दरम्यान, घातलेले कपडे तोकडे नव्हते तर टी-शर्ट आणि जीन्स घातल्याचे या तरुणीनं पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय, वरिष्ठ नागरिकांकडून अशा पद्धतीची वागणूक मिळणं योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत प्रवाशांकडून मिळालेल्या गैरवर्तणुकीबाबत तरुणीनं संताप व्यक्त केला आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालFacebookफेसबुकSocial Viralसोशल व्हायरल