शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

‘त्या’तरुणीने भय्यू महाराजांवर टाकले होते जाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 06:11 IST

भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी प्रथमच त्यांच्या आईने मौन सोडले आहे. चालक कैलाश पाटील उर्फ भाऊने केलेल्या सर्व आरोपांना त्यांनी दुजोरा दिला आहे. सद्या कुमुदनी यांची प्रकृती खराब आहे.

इंदूर : ‘‘ती युवती भय्यू महाराजांकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात वर्चस्व गाजवू लागली. भय्यू महाराजांच्या बेडरुममध्ये थांबत होती. त्यांच्या कपाटात कपडे ठेवत होती. बाथरुममध्ये स्रान करत होती. विनायक आणि शेखर हेही तिच्याशी मिळालेले होते. सर्वांनी कट करुन भय्यू महाराजांना जाळ्यात फसविले आणि ब्लॅकमेल करु लागले’’असा खुलासा भय्यू महाराज (उदयसिंह देशमुख) यांच्या आई ७५ वर्षीय कुमुदनी देशमुख यांनी केला आहे.भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी प्रथमच त्यांच्या आईने मौन सोडले आहे. चालक कैलाश पाटील उर्फ भाऊने केलेल्या सर्व आरोपांना त्यांनी दुजोरा दिला आहे. सद्या कुमुदनी यांची प्रकृती खराब आहे. त्या बेडवरुन उठूही शकत नाहीत. आपल्या मुलाची आठवणक काढून सतत रडत असतात.महाराजांच्या आई कुमुदनी म्हणाल्या की, मला माहित आहे की, शेखर आणि विनायक भय्यू महाराजांना एकटे पाहून त्या मुलीला हे दोघे फोन करत होते. भय्यूजी महाराज भलेही स्रान करत असोत, तरीही जबरदस्तीने त्यांच्या कानाला फोन लावत असत. कुमुदनी यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करुन हीच बाब सांगितली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी अगम जैन यांनी सांगितले की, लवकरच कुमुदनी, आयुषी आणि कुहू यांचे जबाब घेण्यात येतील.शेखरचा महाराजांवर दबावआई कुमुदनी यांनी आरोप केला आहे की, भय्यू महाराजांना त्या तरुणीने मारले आहे. आश्रमात काम मागायला ती आली होती. हळूहळू घरात वर्चस्व निर्माण केले. एकटी तीच नव्हे, तर विनायक, शेखरही या कटात सहभागी होते. विनायक नाली साफ करायचा. त्याचे वडील काशिनाथ आश्रमात सेवा करायचे. काशीने मुलाची भेट करुन दिली आणि भय्यू महाराजांकडे नोकरीला ठेवले. त्याने जाळे टाकले आणि भय्यू महाराजांना मुठीत घेतले. शेखर तर महाराजांवर दबाव टाकून असायचा. एकदा भय्यू महाराज पूजेसाठी जात होते. त्याने तरुणीचा उल्लेख केला आणि सांगितले की, महाराज तर तिच्यासोबत फिरायला गेले आहेत. तेव्हा मी त्याला खूप फटकारले होते. त्याने मला उलटून उत्तर दिले होते.विनायकसोबत ‘तिचे’ आक्षेपार्ह फोटोमहाराजांना ब्लॅकमेल करणारी तरुणी आणि सेवेकरी विनायक यांचे आक्षेपार्ह फोटो समोर आले आहेत. विनायक आतापर्यंत त्या तरुणीला आपली बहीण आणि महाराजांच्या मुलीसारखी असल्याचे सांगत होता. पोलिसांनी लाखो रुपयांचे बिलही जप्त केले आहेत. या वस्तू महाराजांना धमकावून खरेदी केल्या जात होत्या. या चौकशीनंतर आता सेवेकरी विनायक दुधाळे आणि ब्लॅकमेल करणारी तरुणी यांच्या समस्या वाढल्या आहेत. रविवारी या तरुणीने चौकशीत सांगितले होते की, महाराजांची मुलगी कुहूची आपण केअरटेकर होतो. महाराज आपणास मुलगी मानत होते. त्यांच्या कुटुंबियांना आमची जवळीक आवडली नाही आणि अनैतिक संबंधांचे आरोप करणे सुरु केले. विनायकने म्हटले आहे की, तरुणी खरे सांगत आहे. ती महाराजांना ब्लॅकमेल करत नव्हती. ती तर आपल्याला बहिणीसमान आहे. सोमवारी पोलिसांनी तरुणी आणि विनायकचा खोटारडेपणा समोर आणला. पोलिसांना असे फोटो मिळाले आहेत ज्यात तरुणी विनायकसोबत आक्षेपार्ह स्थितीत आहे. महाराजांच्या मोबाइलमध्ये भुरु, कुकु आणि अन्य नावांनी नंबर सेव्ह आहेत. महाराज तिला प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारत. महाराज आणि तरुणीमधील आक्षेपार्ह चॅटिंगही मोबाइलमध्ये मिळाली आहे. पोलिसांनी सूट, ज्वेलरी, मोबाइल आणि फ्लाइटचे लाखो रुपयांचे बिल ताब्यात घेतले आहेत. अधिकाºयांचा असा दावा आहे की, तरुणीने महाराजांवर दबाव आणून महागड्या वस्तू खरेदी केल्या होत्या.सचिवावर संशय : पोलिसांनी ट्रस्टचे सचिव तुषार पाटीलची चौकशी केली आहे. त्याच्यावरही सत्य लपविल्याचा संशय आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुषार संशयित विनायक, शेखर आणि शरद यांच्या संपर्कात आहे. जबाबानंतर तिघे आश्रमात जात होते. ज्यांच्यावर या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे त्यांच्याशी तुषारचे भेटणे संशय निर्माण करतो. महाराजांचे विश्वसनीय संजय यादव, संदीप काटे यांच्याशीही पोलीस चर्चा करत आहेत. पुणेस्थित आश्रमाचे कामकाज पाहणाºया अमोल चव्हाण याचीही पोलिसांनी चौकशी केली. महाराजांच्या गोपनीय नंबरमध्ये अमोलचा नंबर होता. तो ११ जून रोजी दिवसा आणि रात्री सतत बोलत होता. महाराजांशी संबंधित अनूप राजोलकरलाही बोलविण्यात आले आहे.तरुणीसोबत गुजरातमध्ये गेला होता कॉन्ट्रॅक्टरमहाराजांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त जमीन खरेदी - विक्रीत सहभागी कॉन्ट्रॅक्टर मनमीत अरोरा सहा महिने पोलिसांना चकवा देत होता.रविवारी झालेल्या चौकशीत त्याने मान्य केले की, तरुणी आणि महाराजांचे संबंध होते. १३ मे रोजी तो तरुणीला घेऊन महाराजांसोबत गुजरातमध्ये गेला होता. अरोराने सरकारी साक्षीदार बनण्यास सहमती दिली आहे.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराज