शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! मर्सिडीज पाहून प्रेमात पडली; लग्नानंतर घरी पोहोचल्यावर नवरा निघाला मजूर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:32 IST

तरुणीने फोटो पाहून लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केले, पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा तिला धक्काच बसला.

सोशल मीडियाचे जग कधी-कधी खऱ्या आयुष्याच्या जगापासून दूर असते, पण मोबाईलवरचे फोटो बघून आपण दूरच्या ठिकाणच्या आनंद घेऊ लागतो. आजकाल सोशल मीडियाच्या या जगात प्रेमाची पद्धत बदलली आहे, मात्र या मार्गात अनेकवेळा फसवणूक होत असते, असाच काहीसा प्रकार नुकताच दिल्लीतील एका तरुणीसोबत घडला. जी एका मुलाच्या प्रेमात पडला होती, ज्याने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर मर्सिडीजसोबतचा फोटो टाकला होता.

तरुणीने फोटो पाहून लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केले, पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा तिला धक्काच बसला. मिळालेल्याा माहितीनुसार, एका तरुणाने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर मर्सिडीजसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, जो पाहून दिल्लीतील एक मुलगी तरुणाच्या प्रेमात पडली. आधी दोघांचे सोशल मीडियावरून बोलणे झाले, नंतर दोघांची दिल्लीत भेट होऊ लागली, वर्षभर प्रेम फुलले आणि दोघांचे लग्न झाले.

दिल्लीतच दोघेही भाड्याच्या घरात राहू लागले. त्याचवेळी रमजानचा महिना सुरू होताच तो तरुण आपल्या गावी रामपूर आला. पत्नीने लपूनछपून पतीचा पाठलाग केला. गावात पोहोचल्यावर जे सत्य समोर आलं, त्याने ती हादरली. सासरच्या घरी गेल्यावर मुलीने पाहिले की तिचे सासरचे घर झोपडपट्टीत बांधलेले आहे, तिचा नवरा श्रीमंत नसून रोजंदारीवर काम करणारा आहे. तरुणीने गोंधळ घातला. जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा पोलीसही पोहोचले. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दोघेही एकमेकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले, जिथे मुलगा श्रीमंत असल्याचं खोटे बोलत होता, तर मुलगीही खोटं बोलत होती. तरुणीचे हे तिसरे लग्न असून, ती अनेकदा दुबईला गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी चौकशी केली असता तरुणीही इंग्रजी बोलू लागली. त्यानंतर पोलीस तपासात दोघांनीही एकमेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"