शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार

By प्रविण मरगळे | Updated: December 19, 2020 08:37 IST

मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं

ठळक मुद्देया प्रकरणावरून हिंदू संघटना सक्रीय झाल्या असून लव्ह जिहादवरून कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहेअनेक हिंदू संघटनांच्या नेत्यांनी माझी भेट घेतली आणि मला समजवण्याचा प्रयत्न केलाआता मी निर्णय घेतला मुलाला हिंदू धर्माचा स्वीकार करण्यासाठी सांगणार

वडोदरा – गुजरातच्या वडोदरामध्ये एका २३ वर्षीय ब्राह्मण मुलीने धर्म परिवर्तन करून मुस्लीम मुलाची निकाह केला होता. मुंबईच्या वांद्रे येथे मस्जिदमध्ये झालेल्या निकाहानंतर लव्ह जिहादवरून राजकारण चांगलेच तापले, वडोदरा येथे हिंदू संघटनांनी गदारोळ सुरु केला होता, ज्यानंतर गुजरातची एक टीम मुंबईला पोहचली आणि दोघांना घेऊन पुन्हा वडोदरा गाठलं, पोलिसांनी मुलगी आणि मुलाला आपापल्या घरी पाठवलं आहे.

आता निकाह करणाऱ्या मुलीचं म्हणणं आहे की, मी मुलाला हिंदू बनवते, मुलगी सध्या तिच्या वडिलांच्या घरी आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत अनेक हिंदू संघटनांच्या नेत्यांनी मुलीच्या घरी भेट दिली, तेव्हा मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. मी मुलाला गेल्या ६ वर्षापासून ओळखते, मित्रांच्या संपर्कात आल्याने आमची भेट झाली, त्यानंतर आम्ही वारंवार एकमेकांच्या संपर्कात आलो असं त्या मुलीचं म्हणणं आहे.

मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं, त्याठिकाणी दोघांनी लग्न केलं, त्यानंतर १६ डिसेंबरला आम्ही परत वडोदरा येथे आलो, तेव्हा अनेक हिंदू संघटनांच्या नेत्यांनी माझी भेट घेतली आणि मला समजवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आता मी निर्णय घेतला मुलाला हिंदू धर्माचा स्वीकार करण्यासाठी सांगणार आहे.

दुसरीकडे या प्रकरणावरून हिंदू संघटना सक्रीय झाल्या असून लव्ह जिहादवरून कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंदू जागरण मंचाचे नीरज जैन यांचे म्हणणं आहे की, मुस्लीम मुलं डाव आखून हिंदू युवतींना पळवून नेतात आणि जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करायला लावतात, त्यामुळे लवकरच लव्ह जिहादसाठी कायदा बनवणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग  

"लव्ह हा एक चांगला शब्द आहे. लव्ह प्रेम विवाहाची परंपरा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हापासून सुरू आहे. यात कोणालाही आक्षेप नाही. मात्र, ज्यावेळी जिहाद जोडला जातो, त्यावेळी ते विषबाधा होते. लव्ह जिहाद हिंदूच्या मुलींना खोटी नावे ठेवून फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून दहशतवादी जन्माला घातला जातो आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते असं भाजपा खासदार साक्षी महाराज काही दिवसांपूर्वी म्हणाले. याचबरोबर, प्रेम विवाह 99 टक्के यशस्वी असतात, पण लव्ह जिहाद 99 टक्के अपयशी ठरतात. तर लव्ह जिहादचे पैसे परदेशातून येतात. जिथे कट्टर हिंदूच्या मुलींची किंमत 11 लाख रुपये आहे. ब्राह्मण ठाकूर आणि ओबीसी मुलींच्या वेगवेगळ्या किंमती निश्चित आहेत. तसेच, मदरसे व मशिदीमधून हे चालविले जाते, असा दावा साक्षी महाराज यांनी केला आहे.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमLove Jihadलव्ह जिहादPoliceपोलिसGujaratगुजरात