शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:29 IST

लग्न ठरल्यानंतर एका मुलीने तिच्या भावी पतीचा नंबर ब्लॉक केला. यानंतर मुलाने रागाच्या भरात एक भयंकर पाऊल उचललं.

बिहारच्या बांका जिल्ह्यातील अमरपूर परिसरातील पवई गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरल्यानंतर एका मुलीने तिच्या भावी पतीचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतर मुलाने रागाच्या भरात एक भयंकर पाऊल उचललं. कीटकनाशक प्राशन करून तो एका टेकडीवर जाऊन झोपला. त्याला रेफरल हॉस्पिटल येथे आणण्यात आलं. प्राथमिक उपचार केल्यानंतर जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आलं. तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. 

पवई गावातील रहिवासी मिथुन कुमार दास याचं लग्न भलूआर गावातील एका मुलीसोबत ठरलं होतं. यानंतर मुलगा आपल्या भावी पत्नीशी बोलण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. मुलीचा फोन अनेक वेळा वाजला, पण समोरून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर फोन केल्यावर कळलं की, मुलीने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. यामुळे संतापलेल्या तरुणाने असं काही केलं, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. 

तरुणाने कीटकनाशक प्राशन केलं. गावातील काही लोकांनी त्याला बराच वेळ टेकडीवर झोपलेलं पाहिलं. त्यानंतर त्याला खाली आणलं. कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये तरुणाची आई इनवा देवी सांगतात की, त्यांच्या मुलाचं लग्न भलूआर गावात ठरलं होतं. 

मुलाला त्याच्या भावी पत्नीशी बोलायचं होतं, परंतु मुलगी अभ्यासाचं कारण देत त्याच्याशी बोलण्यास नकार देत होती. सोमवारी संध्याकाळी तो टेकडीकडे गेला असता दोघांमध्ये फोनवरून भांडण झालं. यानंतर मुलाने विषारी द्रव्य प्राशन केलं. तरुणाच्या मित्रांनी सांगितलं की, तो मुलीच्या आईसोबत बोलत होता.  

मुलीच्या आईने त्याला सांगितलं की, त्यांची मुलगी सध्या मॅट्रिकच्या परीक्षेची तयारी करत आहे. लग्न पुढच्या वर्षी होणार आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मुलीने त्याचा फोन नंबर ब्लॉक केला. या सर्व प्रकारानंतर तरुणाने गुपचूप कीटकनाशक प्राशन केलं आणि टेकडीवर जाऊन झोपल्याचं समोर आलं आहे.  

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न