शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'अगला मुख्यमंत्री कैसा हो, गिरिराज सिंह जैसा हो', बेगुसरायमध्ये गिरिराज पोहोचताच घोषणाबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 13:46 IST

भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना बिहारचे पुढील मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहत आहेत.

पाटणाः भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना बिहारचे पुढील मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहत आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रविवारी गिरिराज सिंह बेगुसराय या स्वतःच्या मतदारसंघात पोहोचले. त्यानंतर सिंह यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं. 'अगला मुख्यमंत्री कैसा हो, गिरिराज सिंह जैसा हो', अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तर भाजपाच्या एका नेत्यानं सांगितलं की, पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक गिरिराज सिंह यांच्याकडे बिहारच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपात पाहतात.गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि मोदींमध्ये दुरावा वाढत चालला आहे. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली असून, पुरेशी मंत्रिपदे न मिळाल्याने मंत्रिमंडळात सहभागी न झालेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपाला आज अजून एक धक्का दिला आहे. भाजपाशी असलेली आघाडी केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवताना बिहारबाहेर सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे.जेडीयूने एनडीएतील आपल्या सहभागाबाबत मोठी घोषणा केली आहे. भाजपासोबतची एनडीएमधील आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवण्याची आणि बिहारबाहेर एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम न करण्याची घोषणा जेडीयूने केली. त्यामुळे जेडीयू आणि भाजपाची आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित राहणार आहे. तर बिहारबाहेर जेडीयू स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आगामी वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यात जेडीयू स्वबळावर लढणार आहे. येत्या काळात भाजपा आणि जेडीयूमधील दरी आणखी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :Biharबिहार