शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चक्क भुताने एफआयआर नोंदवला, वकीलही दिला; न्यायमूर्तींना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 10:33 IST

एका व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी फसवणूक आणि बनावट दस्तावेजाचा एफआयआर दाखल केल्याचे हे प्रकरण आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती -

अलाहाबाद : अलाहाबाद हायकोर्टासमोर  भूत तक्रारदार  असलेल्या असामान्य प्रकरणाची सुनावणी झाली. एका व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी फसवणूक आणि बनावट दस्तावेजाचा एफआयआर दाखल केल्याचे हे प्रकरण आहे.

पुरुषोत्तम सिंग यांनी त्यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तावेज तयार केल्याचा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्यावर शब्द प्रकाश यांनी जमिनीच्या वादातून खोटा गुन्हा दाखल केल्याचा त्यांचा दावा होता. शब्द प्रकाश यांच्या वतीने  अधिवक्ता विमल कुमार पांडे यांनी १९ डिसेंबर २०२३ रोजी ममता देवी यांच्या स्वाक्षरीने हायकोर्टात वकालतनामा दाखल केला आहे.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की, शब्द प्रकाश यांचा मृत्यू १९ डिसेंबर २०११ रोजी झाला होता. २०१४ मध्ये त्यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला. मुख्य न्यायदंडाधिकारी, कुशीनगर यांनी शब्द प्रकाशच्या मृत्यूची पुष्टी केली.

हे ऐकून आम्ही नि:शब्द असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी यांनी नोंदवले. एका मृत व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी एफआयआर दाखल करणे हे फारच विचित्र आहे.  इतकेच नव्हे, तर त्यांनी अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला. तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले व मृत व्यक्तीला फिर्यादी पक्षाचा साक्षीदार म्हणून पुढे केले. आता सुनावणीत त्यांच्या वतीने वकीलही उभे आहेत. 

सर्व कार्यवाही भुताटकीने चालवलीसर्व कार्यवाही भुताटकीने चालवल्याचे दिसून येते, असे म्हणत हायकोर्टाने फौजदारी खटल्याची कार्यवाही रद्द केली आणि कुशीनगरच्या पोलीस अधीक्षकांना तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांना मृताच्या वतीने वकालतनामा दाखल करणाऱ्या वकिलाला भविष्यात दक्ष राहण्याचा सल्ला देण्यास सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस