उत्तर प्रदेशमधील एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून तीन मुलींनी जीवन संपवल्याच्या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या तीन मुलींनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली होती, तसेच मोबाईल फोनबाबत नाराजी, भावनिक खच्चीकरण आदींमुळे या मुलींनी जीवन संपवल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या प्रकरणाचा तपास पुढे सरकू लागल्यापासून या मुलींचे वडील आणि कुटुंबीयांबाबतच्या काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात २०१५ साली झालेल्या एका आत्महत्या प्रकरणाची बाबही समोर आली आहे. त्यात या तीन मुलींच्या वडिलांच्या लिव्ह इन पार्टनरचा मृत्यू झाला होता.
गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत घडलेल्या या घटनेबाबत विचारणा केल्यावर तिथले स्थानिक रहिवासी त्या दिवशी सारं काही सामान्यपणे सुरू होतं. काही वेळातच अशी दुर्घटना घडेल याची कुणाला कल्पनाही नव्हती. मात्र अचानक घडलेल्या या घटनेनं सारं काही बदलून गेलं. दरम्यान, या तीन बहिणींच्या मृत्युप्रकरणाचा तपास सुरू झाल्यावर पोलीस रेकॉर्डमधील एक जुनं प्रकरण पुन्हा समोर आलं.
२०१५ मध्ये या तिन्ही मुलींच्या वडिलांसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. राजेंद्रनगर कॉलनी साहिबाबाद येथील एका फ्लॅटच्या छतावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद असल्याचे मानले गेले होते. मात्र अधिक तपासानंतर ही आत्महत्येची घटना असल्याचे सांगत या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते जुने प्रकरण आणि आता घडलेलं तीन बहिणींच्या जीवन संपवण्याचं प्रकरण यात कुठला संबंध आहे असं दिसत नाही. मात्र कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी त्या घटनेचाही तपासामध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मृत मुलींच्या वडिलांच्या तीन पत्नी असून, त्या एकमेकींच्या सख्ख्या बहिणी असल्या तपासातून समोर आले आहे. आता अजब कौटुंबिक गुंत्याचीही माहिती घेतली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : Three sisters' suicide in Uttar Pradesh reveals disturbing family history. A past suicide of their father's live-in partner resurfaces. The father had three wives, who were sisters. Police are investigating possible connections.
Web Summary : उत्तर प्रदेश में तीन बहनों की आत्महत्या से परेशान करने वाला पारिवारिक इतिहास सामने आया है। उनके पिता की लिव-इन पार्टनर की पिछली आत्महत्या फिर से सामने आती है। पिता की तीन पत्नियाँ थीं, जो बहनें थीं। पुलिस संभावित संबंधों की जांच कर रही है।