शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 08:18 IST

गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

ठळक मुद्देमास्क लावण्याचा आग्रह करून सरकार लोकांना आजारी पाडत आहे. हे खूप मोठं षडयंत्र मी मास्क घालत नाही कारण मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास आहे. मी कोरोनाला मानत नाही. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो.

मथूरा – उत्तर प्रदेशच्या मथूरा गाजियाबाद येथे महंत नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जातंय असा दावा नरसिंहानंद यांनी केला आहे. मी ना मास्क लावणार ना कोरोना आहे असं मानणार असं अजब वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकचं नाही तर भारतात मुस्लिमांची वाढती संख्या हिंदूंच्या विनाशाचं कारण बनणार असल्याचा वादग्रस्त दावाही त्यांनी केला.

ज्यांची इम्युनिटी कमी तेच मास्क लावतात

गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मथुरा येथे पोहचले होते. त्यांनी संतांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कोरोनावरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मास्क लावण्याचा आग्रह करून सरकार लोकांना आजारी पाडत आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे. मी मास्क लावत नाही. कोरोना आहे असं मला वाटत नाही. ज्यांची इम्युनिटी क्षमता कमी आहे. ते लोक मास्क लावतात असं त्यांनी सांगितले.

मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास

मी मास्क घालत नाही कारण मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास आहे. मी कोरोनाला मानत नाही. ज्यांची इच्छाशक्ती कमी अथवा कमकुवत आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत तेच लोक कोरोनामुळे मृत्यू पावत आहेत. माझे सर्व माझ्या सोबत आहे असंही नरसिंहानंद म्हणाले.

तर गुरुवारी गोवर्धन परिक्रमा येथील रमणरेती आश्रमातील कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केले. भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका. प्रत्येक हिंदूने कमीत कमी ५ ते ६ मुलांना जन्म द्यायला हवा. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो. प्रत्येक हिंदूला शस्त्रधारी बनण्याची आवश्यकता आहे असंही महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले.

 नरसिंहानंदांची वादग्रस्त मालिका

डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. मग तो पत्रकार असो वा सरकारी अधिकारी. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी आहे असं ते म्हणाले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuslimमुस्लीमHinduहिंदू