शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक मसाज! सलूनमध्ये मसाज करायला गेला आणि मानेला लकवा मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:46 IST

सलूनमध्ये जावून वारंवार मानेची मालीश करून घेणं अजॉय कुमार सिंग यांना चांगलंच महागात पडलंय. सातत्याने मानेला झटका देऊन अजॉय कुमार यांच्या मानेच्या दोन्ही शिरांना लकवा मारला आहे.

नवी दिल्ली, दि. 19 - सलूनमध्ये जावून वारंवार मानेची मालीश करून घेणं दिल्लीच्या अजॉय कुमार सिंग यांना चांगलंच महागात पडलंय. सातत्याने मानेला झटका देऊन अजॉय कुमार यांच्या मानेच्या दोन्ही शिरांना लकवा मारला आहे. श्वास घेण्यास त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.  त्यांच्या या त्रासावर कोणताही उपचार नसून त्यांना आता आयुष्यभरासाठी कृत्रिम श्वासोच्छवासाची मदत घ्यावी लागत आहे.

अजय कुमार हे नेहमीप्रमाणे सलूममध्ये गेले होते. तिथे त्यांनी सलूनवाल्याकडून मान मोडून घेतली. पण घरी आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्रास वाढल्यामुळे तात्काळ ते मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले.  हृदयविकारामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याचं त्यांना वाटलं. मेदांता हॉस्पीटलच्या रेस्पिरेट्री अॅंड स्लीप मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. आनंद जैस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजॉय कुमार यांना तीन महिन्यांपासून श्वसनाचा त्रास होत होता. तीन महिन्यात त्यांच्यावर उपचार झाले पण श्वसनाचा त्रास कमी होत नव्हता. त्यानंतर मानेच्या ज्या शिरा श्वसनावर नियंत्रण ठेवतात, त्यांना लकव्याप्रमाणे झटका आला असल्याचं निदान झालं.  त्यामुळे त्यांची श्वसनयंत्रणाच निकामी झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या दिनक्रमाची माहिती घेतल्यावर दर दोन-तीन आठवड्यात सलूनमध्ये जाऊन डोक्याची मालीश करणं आणि मान मोडून घेणं त्यांची सवय असल्याचं कळालं. त्यानंतर सलूनमध्ये मानेला झटका देण्याचा प्रकार झाल्यामुळे श्वसनयंत्रणा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं. 

श्वसनाच्या सर्व शिरा मानेच्या हाडातून जातात. त्यामुळे झोपताना त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. सलूनमध्ये मान मोडल्यामुळेच त्यांच्या मानेच्या दोन शिरांना लकवा मारला असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. 

भारतात सलूनमध्ये मान मोडण्याचे प्रकार सर्रास केले जातात. पण अशाप्रकारच्या मसाज धोकादायक असल्याचं आता समोर येत आहे.