संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी बिहारच्या निकालांचा उल्लेख केला. अनेक पक्ष त्यांच्या पराभवामुळे नाराज आहेत. पीएम मोदी यांनी विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकार १४ विधेयके सादर करू शकते असे मानले जाते.
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मित्रांनो, या अधिवेशनात संसद देशासाठी काय विचार करत आहे, ती काय करू इच्छिते, ती काय करणार आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. चर्चेत असे मुद्दे उपस्थित करा. पराभवाच्या निराशेतून बाहेर या. दुर्दैवाने, काही पक्ष असे असतात की ते पराभव पचवू शकत नाहीत, असा टोलाही पीएम मोदींनी लगावला.
"मला वाटले होते की बिहारचे निकाल येऊन खूप दिवस झाले आहेत, आता ते सुधारले असतील, पण काल मी जे ऐकले त्यावरून असे दिसते की पराभवाने त्यांना त्रास झाला आहे. मी सर्व पक्षांना आवाहन करतो की हिवाळी अधिवेशन हे पराभवाच्या भीतीचे ठिकाण बनू नये. आणि हे हिवाळी अधिवेशन विजयाच्या अहंकारात बदलू नये, असंही मोदी म्हणाले.
"अतिशय संतुलित पद्धतीने, जबाबदारीने, एक लोकप्रतिनिधी म्हणून, देशातील जनतेने मला ही जबाबदारी दिली आहे. ती हाताळताना, पुढे विचार करा, जे आहे ते आपण कसे चांगले करू शकतो. जर ते वाईट असेल तर आपण योग्य टिप्पणी कशी करू शकतो, जेणेकरून देशातील नागरिकांचे ज्ञान वाढेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Web Summary : Ahead of the winter session, PM Modi criticized opposition parties still reeling from election losses. He urged them to constructively participate in debates, focusing on national progress and avoiding negativity. The government plans to introduce 14 bills.
Web Summary : शीतकालीन सत्र से पहले, पीएम मोदी ने चुनाव हार से जूझ रहे विपक्षी दलों की आलोचना की। उन्होंने उनसे राष्ट्रीय प्रगति पर ध्यान केंद्रित करते हुए, रचनात्मक रूप से बहस में भाग लेने का आग्रह किया। सरकार 14 विधेयक पेश करने की योजना बना रही है।