शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साता जन्माच्या गाठी! जर्मनीची तरुणी झाली भारताची सून; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 09:50 IST

जर्मनीची एक तरुणी बिहारच्या मुलाच्या प्रेमात पडली. या दोघांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला.

जर्मनीची एक तरुणी बिहारच्या मुलाच्या प्रेमात पडली. या दोघांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबीयांनी सहमती दर्शवल्यानंतर आता थाटामाटात विवाहसोहळा पार पडला आहे. बिहारमध्ये येऊन मिथिला परंपरेनुसार लगीनगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  बिहारच्या सहरसाच्या पटुआहा गावात राहणारा चैतन्य झा हा जर्मनीत पुढील शिक्षणासाठी गेला होता. 

चैतन्यचे सुरुवातीचे शिक्षण भारतात झाले होते. मात्र पुढील शिक्षणासाठी तो जर्मनीत शिकायला गेला होता. कॉलेजमध्ये पीएचडी करत असताना त्याची मार्था नावाच्या तरुणीशी ओळख झाली. मार्था देखील पीएचडी करत होती. येथे शिकत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मग त्यांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मार्थाने चैतन्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोघांनी आपआपल्या कुटुंबीयांना सांगितलं आणि त्यानंतर लग्न ठरलं.

मार्थाला हिंदी कसं बोलतात ते माहीत नाही, तरीही मिथिला रितीरिवाजांनुसार लग्न करण्यास होकार दिला आणि इथल्या परंपरेनुसार लग्न केलं. चैतन्यच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मार्थाने दोन-तीन महिन्यांत हिंदी शिकणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. लग्नाच्या वेळी वधूने दोन-तीन महिन्यांत हिंदी शिकेन, असे वचन दिले होते. मार्था पोलंडचे रहिवासी ओरलोवास्का यांची मुलगी आहे. लग्नासाठी ती जर्मनीहून तिच्या नातेवाईकांसह भारतात आली. या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BiharबिहारGermanyजर्मनीmarriageलग्न