शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

George Fernandes : एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:36 IST

मुंबई : कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी ...

ठळक मुद्देमाजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले.शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.'सामान्यांच्या – कामगारांच्या अस्मितेसाठी सतत लढा देणारा नेता आपण गमावला'

मुंबई : कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या मॅक्स केअर रुग्णालयात मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. सामान्यांच्या – कामगारांच्या अस्मितेसाठी सतत लढा देणारा नेता आज आपण गमावला आहे. ते माझे व्यक्तिगत मित्र होते. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मी मुकलो आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, देशातील कामगार चळवळीला बळ आणि नवी दिशा देणारे लढवय्ये नेत जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले याचे मला मोठे दु:ख झाले आहे. जॉर्ज हे १९४९ च्या सुमारास मुंबईत आले आणि मुंबईचे झाले. मुंबईत कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी फर्नांडिस यांनी स्वत:ला झोकून दिले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची सशक्त संघटना उभारली. रेल्वे कामगार संघटनांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

ते एक उत्तम संसदपटू तर होतेच परंतु देशाचे उद्योगमंत्री व संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना एक प्रभावी प्रशासक म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. जॉर्ज एक निष्णात वाकपटू होते. विविध भाषांवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. अशी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, सामान्यांच्या – कामगारांच्या अस्मितेसाठी सतत लढा देणारा नेता आज आपण गमावला आहे. ते माझे व्यक्तिगत मित्र होते. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मी मुकलो आहे, असेही शरद  पवार म्हणाले.

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसSharad Pawarशरद पवार