शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात अडकलेली गीता भारतात परतणार

By admin | Updated: October 15, 2015 23:41 IST

सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व तेव्हापासून तेथेच अडकून पडलेल्या गीता या मूक-बधिर मुलीच्या बिहारमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा शोध लागला

नवी दिल्ली/ कराची : सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व तेव्हापासून तेथेच अडकून पडलेल्या गीता या मूक-बधिर मुलीच्या बिहारमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा शोध लागला असून येत्या काही दिवसांत तिला भारतात परत आणण्यात येणार आहे.अशाच प्रकारे भारतात अडकलेल्या एका पाकिस्तानी मूक-बधिर मुलीला तिच्या नातेवाईकांकडे पोहोचविण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’चे काल्पनिक कथानक सलमान खानने बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर साकारल्यानंतर गीताची सत्यकथा प्रसिद्धी माध्यमांतून समोर आली व तिच्या भारतातील कुटुंबाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना गेल्या काही महिन्यांत गती आली होती.गीताच्या कुटुंबाचा शोध लागल्याचे शुभवर्तमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर जाहीर केले. त्यांनी टिष्ट्वटमध्ये लिहिले, ‘गीता लवकरच भारतात परत येईल. आम्ही तिच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे. डीएनए चाचणी केल्यानंतरच तिला तिच्या कुटुंबाच्या हवाली केले जाईल.’एधी फाऊंडेशन ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी व प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे त्यांच्या कराचीतील अनाथालयात गीताचा सांभाळ करीत आहे. भारताच्या पाकिस्तानमधील दूतावासाने गुरुवारी एक फोटो एधी फाऊंडेशनकडे ईमेल केला. तो फोटो गीताला दाखविला असता तिने त्या फोटोतील व्यक्तींना ओळखले व ते आपले कुटुंबीय असल्याचे सांगितले. तो फोटो गीताचे वडील, सावत्र आई आणि भावंडांचा होता.गीताची कथा सर्वश्रुत झाल्यानंतर भारताच्या विविध भागांतील किमान चार कुटुंबे ती आपली मुलगी असल्याचे सांगत पुढे आली आहेत. त्यामुळे आताच्या ताज्या फोटोतील व्यक्ती आपले कुटुंबीय असल्याचे सांगत असली तरी त्यांचे रक्ताचे नाते डीएनए चाचणीने सिद्ध झाल्यानंतरच गीताला पाकिस्तानातून आणून या कुटुंबियांच्या हवाली केले जाईल, असा स्वराज यांच्या टिष्ट्वटचा अन्वयार्थ आहे.डीएनए चाचणी वगळता गीताच्या भारतीय नागरिकत्वाची खातरजमा करण्यासह तिला परत आणण्याच्या अन्य औपचारिकता पूर्ण होत आल्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.स्वराज यांनी केलेल्या टिष्ट्वटला कराचीतून एधी फाऊंडेशनकडूनही दुजोरा मिळाला. फाऊंडेशनचे प्रवक्ते अन्वर काझमी यांनी सांगितले की, भारतीय दूतावासाने पाठविलेल्या फोटोतील व्यक्ती गीताने ओळखल्या असून ते आपले आई-वडील व चार भावंडे असल्याचे तिने सांगितले आहे.तरीही कोणत्याही संभ्रमास जागा राहू नये यासाठी फोटोतील या व्यक्ती व गीताचे एकदा स्काइपवर प्रत्यक्ष बोलणे करून दिले जावे, असे आम्हाला वाटते. गीतानेही त्यांच्याशी बोलण्याची (अर्थात खाणा-खुणा करून) इच्छा व्यक्त केली आहे, असेही काझमी यांनी सांगितले.सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर गीताला येत्या २० ते २६ आॅक्टोबर दरम्यान केव्हा तरी भारतात परत आणले जाईल. पण नक्की दिवस अद्याप ठरलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. एधी फाऊंडेशनच्या सूत्रांनी फाऊंडेशनचे संस्थापक अब्दुल सत्तार एधी यांच्या पत्नी बिल्किस या स्वत: गीताला घेऊन भारतात जातील, असेही संकेत दिले. एधी दाम्पत्यानेच इतकी वर्षे गीताचा स्वत:च्या मुलीसारखा सांभाळ केला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)>पाकिस्तानमधील अग्रगण्य मानवी हक्क कार्यकर्ते व तेथील त्याच खात्याचे माजी मंत्री अन्सार बर्नी यांनीही गीताला तिच्या कुटुंबाकडे परत पाठविण्यासाठी एखादे व्रत घेतल्यासारखी मोहीम हाती घेतली होती.>>गीता आणि तिच्या कुटुंबाचे सुमारे १५ वर्षांच्या ताटातुटीनंतर पुनर्मिलन होणार आहे. गीता पाकिस्तानात गेली कशी, याची नक्की माहिती नाही. परंतु अमृतसरहून अट्टारीमार्गे लाहोरला जाणाऱ्या रेल्वेगाडीतून ती चुकून पाकिस्तानात पोहोचली, असे मानले जाते. तेव्हा गीता ११ वर्षांची होती.