शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...”

By प्रविण मरगळे | Updated: February 5, 2021 10:24 IST

त्यावरून या सेलिब्रिटींविरोधत अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला

ठळक मुद्दे#BlackLivesMatter हा भारताचा मुद्दा नव्हता, तरीही भारतीय कलाकारांनी त्याच्या समर्थनार्थ ट्विट केले होतेसाहजिकच प्रत्येकाचे आयुष्य महत्त्वाचे आहे. पण भारतीय शेतकरी? त्यांच्या आयुष्याचं काही महत्त्व नाही का? गौहर खानने केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या कलाकारांवर साधला निशाणा

नवी दिल्ली – देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटल्यानंतर भारतीय कलाकार आता ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देत आहेत. अमेरिकेतील पॉप स्टार रिहानासह अनेक परदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं, याला प्रत्युत्तर म्हणून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी, लता मंगेशकर, करण जोहर तसेच माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केलं, हा भारताचा अंतर्गत विषय असून आम्ही तो सोडवण्यास सक्षम आहोत असं कलाकारांचा म्हणणं होतं, एकप्रकारे केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करणारे ट्विट कलाकारांनी केले होते.

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज? 

त्यावरून या सेलिब्रिटींविरोधत अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला. सेलिब्रिटीजच्या या ट्विटवर गौहर खान हिनेही ट्विट केले, ज्यात तिने #BlackLivesMatter हा भारताचा मुद्दा नव्हता, तरीही भारतीय कलाकारांनी त्याच्या समर्थनार्थ ट्विट केले होते याचा उल्लेख केला. गौहर खानने ट्विटमध्ये लिहिलंय की, #BlackLivesMatter हा भारतीय मुद्दा नव्हता परंतु प्रत्येक भारतीय कलाकार त्याच्या समर्थनार्थ ट्विट करत होते, कारण साहजिकच प्रत्येकाचे आयुष्य महत्त्वाचे आहे. पण भारतीय शेतकरी? त्यांच्या आयुष्याचं काही महत्त्व नाही का? असा सवाल तिने केला आहे.

तसेच "गौहर खानचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याचबरोबर लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील देत आहेत. गौहर खानखेरीज नकुल मेहता, स्वरा भास्कर, वरुण ग्रोव्हर आणि इरफान पठाण यांनीही यासंदर्भात ट्विट देखील केले आहे. #BlackLivesMatter हा अमेरिकेशी संबंधित मुद्दा होता, जेव्हा ह्यूस्टन येथे राहणाऱ्या जॉर्ज फ्लॉयड, ज्यांचे वय ४६ वर्ष होते, त्यांना एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाला होता.

‘सत्तेचा फॉर्म्युला तयार, फक्त बटण दाबायची देरी' बंद दाराआड नेमकी चर्चा काय घडली?

अमेरिकेतील या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली, अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शने झाली, आंदोलन, धरणं करून निषेध करण्यात आला. फक्त अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात #BlackLivesMatter हा हॅशटॅग वापरून ट्विट करण्यात आलं, अमेरिकेत झालेल्या या दुर्दैवी घटनेचा अनेकांनी विरोध केला. सर्वसामान्य लोकांसह अनेक सेलिब्रिटीजने या मुद्द्यावरून अमेरिकन प्रशासनावर टीका केली होती.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनAkshay Kumarअक्षय कुमारRihannaरिहानाGauhar Khanगौहर खान