भंडारा कारागृहात कैद्यांजवळ आढळला गांजा व सीम कार्ड
By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST
नागपूर : भंडारा कारागृहात कैद्यांजवळ गांजा आणि सीमकार्ड आढळल्याने खळबळ उडाली असून कारागृह अधिकार्यांनी संतप्त होऊन सुरक्षा कर्मचार्यांची झडती घेणे सुरू केले आहे.
भंडारा कारागृहात कैद्यांजवळ आढळला गांजा व सीम कार्ड
नागपूर : भंडारा कारागृहात कैद्यांजवळ गांजा आणि सीमकार्ड आढळल्याने खळबळ उडाली असून कारागृह अधिकार्यांनी संतप्त होऊन सुरक्षा कर्मचार्यांची झडती घेणे सुरू केले आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताकदिनी सकाळी ६.३०च्या सुमारास हितेश धुर्वे नावाच्या कैद्याजवळ २५० ग्रॅम गांजा आढळला. तो जप्त करून धुर्वेचा जबाब नोंदवण्यात आला. त्याने हवालदार माणिक काळे यांनी हा गांजा आणून दिला होता, असे सांगितले. तर, बुधवारी शिवा किसन बागडे या कैद्याकडून मोबाईल सीम कार्ड जप्त करण्यात आले. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.