ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. ६ - दोन महिलांवर सामुहिक बलात्कार झाल्याचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर फिरत असून या व्हिडिओमधील नराधमांचा शोध घेण्यासाठी हैद्राबादमधील महिला संघटनांनी मोहीम सुरु केली आहे.
सुनिता कृष्णन या महिलांच्या हक्कासाठी स्वयंसेवी संस्था चालवतात. दोन दिवसांपूर्वी कृष्णन यांना वॉट्सअॅपवर एक व्हिडीओ आला होता. या व्हिडीओमध्ये सहा नराधम तरुणीवर सामूहिक बलात्कार करत असून पिडीत तरुणीनी त्यांना रोखण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहे. मात्र ते नराधम हसत हसत त्या तरुणीवर बलात्कार करतात असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या नराधमांना तुरुंगात धाडण्यासाठी कृष्णन यांनी कंबर कसली आहे. या व्हिडीओतील नराधमांचा छायाचित्र कृष्णन यांनी सोशल मिडीयावर अपलोडही केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कृष्णन यांनी ही मोहीम सुरु करताच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीची तोडफोडही केली. या व्हिडीओमधील नराधमांच्या भाषेवरुन ही संतापजनक घटना उत्तरभारत, आसाम किंवा ओदिशामधील असावी असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
सुनिता कृ्ष्णन यांनी फेसबूकच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये दिसणा-या नराधमांना कोणी ओळखत असल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी सुनिता यांनी मनेका गांधी व राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे या आरोपींची ओळख कुणाला पटल्यास त्यांनी सुनिता यांना sunitha_2002@yahoo.com या इमेल आयडीवर माहिती पुरवण्यासंबंधी आवाहन केले आहे.