बाराशे उद्योगांवर कारवाई : विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उमा भारतींचे उत्तर
नवी दिल्ली : कानपूर, अहालाबाद,वाराणशी येथे पेयजल आणि स्नानाच्या उद्देशासाठी पाण्याची गुणवत्ता विभिन्न घटकांव्दारे ठरविली जात असून, ती ठिकाणो व वातावरण सतत बदलत असते, त्यामुळे या शहरातील गंगेचे पाणी स्नान व पिण्यासाठी अयोग्य आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही, असे सिंचन, नदी विकास व गंगा संरक्षणमंत्री उमा भारती यांनी सांगितले.
गंगेचे पाणी व पिण्यायोग्य व वापरायोग्य किती तसेच प्रदूषणस्तर पाण्यात चामडय़ासह अन्य घोणरडय़ा बाबी सोडल्या जातात का, त्या रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, या खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत सोमवारी विचारलेल्या प्रश्नावर भारती यांनी उत्तर दिले, की केंद्रीय प्रदूषण नियांत्रण मंडळ व उत्तर प्रदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातील प्रयोगशाळेतपाण्याचे विविध नमुने एकत्र करत असते त्यावरून पाण्याच्या वापराबाबत देखरेख ठेवली जाते.
प्रदूषण पसरवणा:या उद्योगांसंबंधी कडक नियम केले असून, आतार्पयत 444 चर्मोद्योगावर
कारवाई केली आहे. प्रदूषण करणा:या 767 उद्योगांवर जल कायद्यान्वये कारवाई केली आहे. ‘नमामि गंगे ’नावाचा नवा प्रयत्न आपण करत असून, त्यामुळे गंगा संरक्षित होईल. (विशेष प्रतिनिधी)
बायोमासची 18 हजार मेगाव्ॉट वीज
अक्षय्य ऊज्रेच्या माध्यमातून देशात बायोमासमधून 18 हजार मेगाव्ॉट समतुल्य वीजेचे उत्पादन होण्याचा अंदाज ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत जैव इंधनावर आधारित वीजउत्पादनाची शक्यता खूप आहे, याबाबत सरकारचे नेमके लक्ष्य काय आहे असा प्रश्न विचारला. नवीनीकरण ऊर्जा मंत्रलयाकडून देशातील वीजेचा अंदाज घेतला आहे. यासाठी राज्याच्या पातळीवर सवलती, उपकरणो आदी देण्यात आहे. त्यामुळे पुढच्या काळात या ऊज्रेचा आलेख वाढलेला असेल, असे त्यावर सांगण्यात आले.