शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांतून सर्वाधिक लांब सफरीवर ‘गंगा विलास क्रूझ’, ५० दिवसांत गाठणार चार हजार किमीचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 07:40 IST

Ganga Vilas Cruise: जगात नद्यांमधून सर्वाधिक लांबीची सफर करणारी ‘गंगा विलास’ ही क्रूझ केंद्र सरकार सुरू करणार आहे. १० जानेवारीला वाराणसी येथून निघालेली ही क्रूझ बांगलादेशच्या हद्दीतूनही प्रवास करून, तसेच विविध पर्यटनस्थळांना भेट देत आसामच्या दिब्रूगढपर्यंत जाणार आहे.

नवी दिल्ली : जगात नद्यांमधून सर्वाधिक लांबीची सफर करणारी ‘गंगा विलास’ ही क्रूझ केंद्र सरकार सुरू करणार आहे. १० जानेवारीला वाराणसी येथून निघालेली ही क्रूझ बांगलादेशच्या हद्दीतूनही प्रवास करून, तसेच विविध पर्यटनस्थळांना भेट देत आसामच्या दिब्रूगढपर्यंत जाणार आहे. क्रूझ ५० दिवसांत चार हजार किमीचा पल्ला गाठेल. जलमार्गाद्वारे पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे, जलमार्ग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की, गंगा विलास ही क्रूझ आपल्या जलमार्गातील ५०हून अधिक पर्यटनस्थळांना भेट देणार आहे. 

गंगा, ब्रह्मपुत्रामधून प्रवासगंगा विलास क्रूझ गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांतून प्रवास करणार आहे. तिच्या सफरीचे वेळापत्रक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी वाराणसी येथील रविदास घाट येथे जाहीर केले. १० जानेवारीला वाराणसी येथून गंगा विलास क्रूझचा सुरू झालेला प्रवास १ मार्चला दिब्रुगढ येथे संपेल. वाराणसी येथून ही क्रूझ आठव्या दिवशी पाटणा येथे पोहोचेल. तिच्यातून पर्यटक बक्सर, रामनगर, गाझीपूर असा प्रवास करीत, महत्त्वाची पर्यटन व वारसा स्थळे पाहात आसाममधील दिब्रुगढला पोहोचतील. जगातील सर्वांत मोठे तिवराचे जंगल आसाममधील मेयाँग येथे आहे. तिथेही हे पर्यटक भेट देणार आहेत. गंगा विलास क्रूझ ही नदीमार्गे खूप दूरच्या प्रवासासाठी निघणारी व भारतातच बनविलेली पहिली क्रूझ आहे. ही क्रूझ यात्रा सुरू करण्यासाठी इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयडब्ल्यूएआय), अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझेस, जे. एम. बक्षी रिव्हर क्रुझेस या तिघांमध्ये एक करार झाला आहे. 

टॅग्स :riverनदीtourismपर्यटन