शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनवरून 24 वर्षीय तरूणीचं अपहरण करून धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 16:03 IST

 नोएडामध्ये एका 24 वर्षीय तरूणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ठळक मुद्दे नोएडामध्ये एका 24 वर्षीय तरूणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला मेट्रो स्टेशनजवळून कारमध्ये खेचण्यात आलं होतं.डित महिलेचं नोएडाच्या गोल्फ कोर्स मेट्रो स्टेशनवरून अपहरण करण्यात आलं होतं.

नोएडा, दि.23-  नोएडामध्ये एका 24 वर्षीय तरूणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला मेट्रो स्टेशनजवळून कारमध्ये खेचण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. पीडित महिलेचं नोएडाच्या गोल्फ कोर्स मेट्रो स्टेशनवरून अपहरण करण्यात आलं होतं. नंतर तीला दिल्लीच्या अक्षरधाम भागात टाकून देण्यात आलं. पीडित महिला नोएडाच्या सेक्टर 36 मधील रहिवासी आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ती रीक्षेची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी स्कॉर्पिओ गाडीतून दोन जण आले आणि त्यांनी पीडित मुलीला सेक्टर 18 चा रस्ता विचारला. मुलगी त्यांना रस्ता सांगत असताना त्यांनी तिला गाडीच्या आत खेचलं आणि तेथून पळाले.

पीडित मुलीला कारमधून नोएडा आणि दिल्लीतील विविध ठिकाणी फिरवत तिच्यावर सामूहित बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीवर बलात्कार करून तिला मध्यरात्री दोन वाजता दिल्लीतील अक्षरधाम मंदिराच्या परिसरात टाकून आरोपी तेथून पळून गेले. नंतर त्या मुलीने 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. मुलीच्या फोननंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला नोएडा सेक्टर 39 च्या पोलीस स्थानकात आणलं.

पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि धमकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती नोएडा सेक्टर 39 चे पोलीस अधिकारी अवनिश दिक्षीत यांनी दिली आहे. पीडित मुलीने वैद्यकिय तपासणीसाठी नकार दिला तसंच तपासासाठी तिचा मोबाइल फोनही द्यायला नकार दिला आहे, अशी माहितीही दिक्षीत यांनी दिली आहे. पीडित मुलीला आता वैद्यकिय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचं समजतं आहे. 

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून लवकर आरोपींना अटक होईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारNew Delhiनवी दिल्ली