शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:32 IST

राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली.

नवी दिल्ली - राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ’ असा जयजयकार करत दिल्लीकरांनी लाडक्या बाप्पाचे अत्यंत श्रद्धेने विसर्जन केले.यमुना नदीवरच्या घाटांसह अनेक पाणवठ्यांवर आज सकाळपासून मराठी-अमराठी भाविकांची लगबग होती. गणपती विसर्जन करताना भाविक भक्त आनंदीही होते आणि गणरायाला निरोप देताना भावूकही होत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करणाऱ्या जयघोषामुळे यमुना नदीचा तीर ठिकठिकाणी दुमदुमला होता.गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना झाली. मोठ्या धामधुमीमध्ये गणपतीची अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना झाली. दहा दिवस बाप्पाला वेगवेगळी पक्वान्ने, मोदक यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम साजरे झाले. आरती, प्रसाद यामुळे गेले १० दिवस आनंदाची लहर दिल्लीकरांमध्ये होती. उत्सवाचा परमोच्च बिंदू असलेल्या गणेश विसर्जनाचा थाट आज आगळाच होता.यादरम्यान दीड दिवसांच्या, पाच आणि सात दिवस प्रतिष्ठापना केल्या जाणाºया गणपतीचे विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाची परंपरा सर्वाधिक प्रचलित आहे. त्यामुळे आज ११ व्या दिवशी दिल्लीत बाप्पांना त्यांच्या गावी निरोप देण्यासाठी उत्साही लगबग झाली होती. आलिशान मोटारींमध्ये आणि दुचाकीवरून, हातगाड्यांवरूनही लोक गणेशमूर्ती घाटांवर आणत होते. लहान मुले, मुलींनीही फेर धरत, फुगड्या खेळत, ढोलक्याच्या ठेक्यावर नृत्य करत मिरवणुकांमध्ये भाग घेतला. सर्वत्र छोट्या छोट्या मिरवणुका काढत, नाचत गात घरगुती आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ७ वाजून ४९ मिनिटे ते १२.१९, दुपारी २ ते ३.३० आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११ असे विसर्जनाचे मुहूर्त होते. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत यमुनाकाठ गणेशमय झाला होता.राष्ट्रीय एकतेचे प्रतीकगणेशोत्सवाचे केवळ धार्मिक महत्त्व नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणूनसुद्धा गणपतीला महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या शासन काळात संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात गणेश पूजन सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी १८५७ च्या अपयशी क्रांतीनंतर देश एकासूत्रात बांधण्यासाठी हा उत्सव सुरू केला होता.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनNew Delhiनवी दिल्ली