शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

3 फूट उंचीमुळे गणेशला MBBS प्रवेश नाकारला, पठ्ठ्यानं सुप्रीम कोर्टातून अॅडमिशन मिळवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 18:00 IST

भावनगर जिल्ह्यातील गणेश बारैय्यावर जणू निसर्गानेच कोप केला. त्यामुळे लहानपणापासूनच त्याची उंची, वजन म्हणजेच गणेशची शारीरिक वाढ खुंटली.

भावनगर - डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या गणेशने आता त्याच्या ध्येय्याच्या दिशेने चालताना एक पाऊल पुढे टाकले आहे. 3 फूट उंची आणि 14 किलो वजन असल्याने 17 वर्षीय गणेशला एमबीबीएससाठी प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, हिम्मत न हारता, गणेशने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर, गणेशला एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे.

गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील भावनगर येथील गणेश बारैय्यावर जणू काळानेच कोप केला. त्यामुळे लहानपणापासूनच त्याची उंची, वजन वयानुसार वाढलेच नाही. 17 वर्षीय गणेशची शारीरिक वाढ खुंटली. शेतकरी मजुराच्या घरात वाढलेला गणेश 6 बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ आहे. बालपणापासूनच त्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यादृष्टीने प्रयत्नही केलं. त्यामुळेच NEET परीक्षेत गणेशने 233 चा स्कोर मिळवला. मात्र, अॅडमिशन कमिटीने गणेशला मेडिकलसाठी प्रवेश नाकारला. तुझे वजन आणि उंची खूपच कमी आहे. तसेच तू 72 टक्के अपंग आहेस. त्यामुळे इमर्जंन्सी केसमध्ये तू ऑपरेशन करु शकत नाही, असा अजब-गजब तर्कही अॅडमिशन कमिटीने दिला होता. मात्र, पठ्ठ्याने हार न मानता कायदेशीर मार्गाने आपली लढाई सुरू केली. विशेष म्हणजे या लढाईत गणेशने विजयही मिळवला. 

शेतमुजराचा मुलगा गणेश

गणेशचे आई-वडिल शेतात मोलमजुरी करतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्याही गणेशची परिस्थिती नाजूक आहे. मात्र, आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करुन गणेशने बाळगलेल्या जिद्दीमुळे नीलकंठ विद्यापीठ तडाजाचे संचालक दलपत भाई कातरिया आणि रैवतसिंह सरवैया यांनी गणेशला मदत केली. गणेशला न्याया देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण, दुर्दैवाने येथेही गणेशची पाठ सोडली नाही. उच्च न्यायालयात गणेशविरुद्ध निर्णय देण्यात आला. तरिही, गणेश खचला नाही, गणेशने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. 

सर्वोच्च न्यायालयात गणेशने लढाई जिंकली 

गणेशने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर तशाच प्रकरणातील आणखी दोघेजण न्याय मागण्यासाठी तेथे आले होते. त्यामुळे गणेशसोबत आणखी दोघांना एकत्र येऊन तिघांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. यावेळी निर्णय या तिघांच्या बाजुने लागला. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत गणेशच्या बाजुने निर्णय दिला. कुठल्याही विद्यार्थ्याला केवळ उंची आणि वजन कमी असल्याने शिक्षण नाकारता येणार नाही, असा निर्णय देत गणेशला मेडिकल प्रवेश देण्याचा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे, आता गणेशचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdoctorडॉक्टरHigh Courtउच्च न्यायालय