शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'शेतकऱ्याची गांधीगिरी', लाच मागणाऱ्या तहसिलदाराच्या जीपलाच बांधली म्हैस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 18:20 IST

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्त रेडिओ जॉकी बनून पीडित आणि दु:खी लोकांचे मोटीव्हेशन करत असतो.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने लाचखोर तहसिलदारास चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्या शेत जमिनीचे नामांतरण करण्यासाठी या शेतकऱ्याकेड तहसिलदाराने चक्क 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत शेतकऱ्यांने चक्क आपली म्हैसच तहसिलदाराच्या जीपला बांधली. गरीब शेतकऱ्याच्या या गांधीगिरीमुळे तहसिलदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. 

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्त रेडिओ जॉकी बनून पीडित आणि दु:खी लोकांचे मोटीव्हेशन करत असतो. तसेच अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्गही सूचवत असतो. अगदी, चित्रपटात संजूबाबाने सांगितलेल्या गांधीगिरीटाईप या शेतकऱ्याने तहसिलदारला धडा शिकवला आहे. चित्रपटात पेन्शनच्या पैशासाठी लाच मागितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासमोर आपले कपडे उतरवत प्रत्येक वस्तूचा हिशेब देणारे गरीब आजोबा आपण पाहिले आहेत. आता, मध्य प्रदेशमधील एका गरीब शेतकऱ्यानेही तशीच गांधीगिरी केल्याचं पाहायला मिळालं. 

जमिनीचे नामांतरण (खातेफोड) करण्यासाठी एका शेतकऱ्याकडे चक्क एक लाख रुपयांची लाच मागितली. या शेतकऱ्याने तहसिलदारांना 50 रुपये दिले. मात्र, उर्वरीत 50 हजार रुपये दिल्याशिवाय काम करत नसल्यामुळे शेतकऱ्याने चक्क 50 हजार रुपयांच्या बदल्यात आपली म्हैसचं तहसिलदाराच्या जीपला बांधली. त्यानंतर, तहसिलदाराला काय करावे हेच कळेना. त्यामुळे लवकरच काम करतो, असे आश्वासन तहसिलदाराने दिले. तसेच पोलिसांना बोलावून ती म्हैसही घेऊन जाण्यास बजावले. त्यावर, पोलिसांनी जीपला बांधलेली म्हैस सोडवून एका झाडाला बांधली. त्यामुळे तात्पुरती तहसीलदाराची सुटका झाली. पण, या घटनेची वाच्यता सर्वत्र झाली असून या जीपचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तहसिलदारांपुढे यक्षप्रश्न उभा राहिला. तसेच ही बातमी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी एसडीएसकडे याबाबत विचारणा करत अहवाल मागितला आहे. 

देवगाव येथील शेतकरी लक्ष्मण यादव यांच्याबाबत ही घटना घडली असून खरगापूरचे तहसिलदार चौकशीच्या फेऱ्यात चांगलेच अडकले आहेत. दरम्यान, याप्रकरणी बलदेवगडच्या एसडीएम वंदना राजपूत यांनी चौकशी सुरू केली असून तहसिलदार सुनिल वर्मा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेतही राजपूत यांनी दिले आहेत. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेश