शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गांधी, आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना, उत्तर प्रदेशात हनुमानाच्या मूर्तीवर चिकटवले पोस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:56 IST

केरळच्या कन्नूर तालुका कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी अज्ञात इसमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर चेन्नईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याखेरीज उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याचे उघडकीस आले.

कन्नूर/चेन्नई/बलिया - केरळच्या कन्नूर तालुका कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी अज्ञात इसमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर चेन्नईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याखेरीज उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याचे उघडकीस आले.केरळच्या कन्नूरमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार पाहणा-याने दिलेल्या माहितीनुसार डोक्याला भगव्या रंगाचे मुंडासे बांधलेला इसम कार्यालयाच्या आवारात साडेआठच्या सुमारास आला व त्याने पुतळ्यावर हाताने मारून राष्ट्रपित्यांचा चष्मा तोडला. नंतर त्याने पुतळ्याच्या गळ्यातील हार जमिनीवर फेकला व तेथून निघून गेला. त्याची छायाचित्रे टिपण्यात आली असली तरी त्यात त्याचा चेहरा दिसत नाही. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. विटंबना करणारा इसम उंच होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तो नंतर बसस्थानकाच्या दिशेने निघून गेला.चेन्नईतील तिरूवोयीत्तूरमधील एका वसाहतीत बसवण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर रंग ओतण्यात आल्याचेही सकाळी उघडकीस आले. ग्रॅमम स्ट्रीटवर हा प्रकार घडला. तेथील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले असून, त्याआधारे आम्ही संबंधित इसमास अटक करू, असे पोलिसांनी सांगितले.उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील खारूव खेड्यात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यावर तणाव निर्माण झाला. महापुरुषांपाठोपाठ देवाच्या मूर्तीची विटंबना झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हनुमानाच्या मूर्तीवर पोस्टर चिकटवण्यात आल्याचे बुधवारी आढळून आले. (वृत्तसंस्था)सर्वत्र निषेध, निदर्शनेकोलकात्यात जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची बुधवारी विटंबना करण्यात आली त्याच्या आदल्या दिवशी त्रिपुरामध्ये लेनिन यांचे दोन पुतळे भाजपा कार्यकर्त्यांनी पाडले.तामिळनाडूच्या वेल्लोर येथे द्रविड चळवळीचे संस्थापक ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात भाजपाच्या विरोधात निदर्शने झाली. लेनिनचे पुतळे पाडल्याच्या निषेधार्थ हैदराबाद, मुंबई, कोलकातासह विविध शहरांत मोर्चे काढण्यात आले.

टॅग्स :Indiaभारतstatue Vandalismपुतळ्यांची विटंबना