पणजी : गोवा सरकारने महात्मा गांधी जयंतीची २ आॅक्टोबरची सुटी सरकारी सुट्यांच्या यादीतून वगळल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या मुद्यावर सारवासारव करताना दिसले. हे कृत्य ‘खोडसाळपणा’ वा ‘ टंकलेखन दोष’ असू शकतो, असे ते म्हणाले. गोवा सरकारच्या काल शनिवारी जाहीर केलेल्या यावर्षीच्या शासकीय सुट्यांमधून महात्मा गांधी जयंतीला वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण झाले, नेमक्या त्याच दिवशी गोवा सरकारने गांधी जयंतीला सार्वजनिक सुटीच्या यादीतून वगळले. राज्यातील आमदारांच्या एका गटाने याला कडाडून विरोध नोंदवला आहे. काँग्रेसने गोवा सरकारच्या या कृत्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. गांधी जयंतीला सार्वजनिक सुट्यांच्या यादीतून वगळणे हा राष्ट्रपित्याचा अपमान आहे. भाजपा सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचा आरोप यानिमित्ताने काँगे्रसने केला. (वृत्तसंस्था)
गांधी जयंतीच्या सुटीचे गौडबंगाल!
By admin | Updated: March 15, 2015 23:23 IST