शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 20:35 IST

केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा पत्रकारांशी संवाद

नवी दिल्ली: चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन आल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापारयुद्ध पेटलं आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असं शेखावत म्हणाले. शेखावत  सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोया संमेलनात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध जोरात सुरू आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असं शेखावत यांनी म्हटलं. कृषी आधारित उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 'चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू असल्यानं भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सोयाबीनमधून तेल काढण्यात आल्यानंतरही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्यामुळे हे उत्पादन महत्त्वाचं आहे. याशिवाय सोयाबीनपासून तयार केली जाणारी काही उत्पादनं पशुंसाठीदेखील चांगला आहार ठरतात,' असं शेखावत म्हणाले. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. मागील सरकारनं तीळ उत्पादकांचा विश्वासघात केला. त्यामुळे खाद्यतेलासाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावं लागलं, असा आरोप शेखावत यांनी केला. 'परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं चारवेळा आयातशुल्कात वाढ केली. याशिवाय तिळाला मिळणारी किमान आधारभूत किंमतदेखील वाढवली. शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,' असं शेखावत यांनी सांगितलं. 

टॅग्स :USअमेरिकाchinaचीनIndiaभारतagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी