शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रीप्स’मधून सूट; माेदींच्या भूमिकेला ‘जी-७’चे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 06:07 IST

परिषदेत माेदींचा सहभाग : सुरक्षित सायबर क्षेत्र पुरविण्याचे आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवाद, हुकुमशाही आणि हिंसक अतिरेकामुळे निर्माण हाेणाऱ्या धाेक्यांपासून मूल्यांचे रक्षण करण्यासाठी भारत ‘जी-७’ राष्ट्रांचा सहयाेगी असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्पष्ट केली. लंडनमध्ये हाेत असलेल्या ‘जी-७’ राष्ट्रांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान माेदींनी व्हर्चुअल माध्यमातून सहभाग घेऊन  भारताची भूमिका मांडली. महत्त्वाचे म्हणजे, माेदींनी केलेेल्या ‘ट्रेड  रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्राॅपर्टी राईट्स’ (ट्रीप्स) करारातून सूट देण्याच्या आवाहनाला ऑस्ट्रेलियानेही समर्थन दिले. 

पंतप्रधान माेदींनी ‘जी-७’ परिषदेत आराेग्य, वातावरण बदल आणि खुल्या समाजाशी संबंधित सत्रांमध्ये सहभाग घेतला. त्यात त्यांनी भारताची सभ्यता, लाेकशाही, वैचारिक स्वातंत्र्य तसेच स्वातंत्र्याबाबतची भूमिका मांडली. माेदींनी खुल्या समाजातील असुरक्षितता अधाेरेखित केली. तसेच आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी सुरक्षित सायबर क्षेत्र उपलब्ध करून देण्याचे आवाहनही माेदींनी केले. 

जगावर आलेल्या सर्वात माेठ्या संकटाचा सामना भारताच्या सहभागाशिवाय शक्य नाही, हे ‘जी-७’ परिषदेत भारताच्या सहभागावरून दिसून येते. आराेग्य व्यवस्था, लसींची उपलब्धता आणि वातावरणातील बदलांबाबत भारत ‘जी-७’ राष्ट्रांसाेबत सदैव सहभागी राहील, असे माेदींनी सांगितले. काेराेना प्रतिबंधक लसींना पेटंटमुक्त करण्याच्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रस्तावाला ‘जी-७’ राष्ट्रांनी व्यापक समर्थन दिल्याचा उल्लेखही माेदींनी यावेळी केला. 

पॅरिस कराराचे उद्दिष्ट भारत गाठणारवातावरण बदलाबाबत माेदींनी एकत्रित उपाययाेजना करण्याचे आवाहन केले. ‘जी-२०’ देशांपैकी पॅरिस कराराचे उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर भारत हा एकमेव देश असल्याचे माेदींनी परिषदेत सांगितले. आंतरराष्ट्रीय साैर आघाडीचे महत्त्वही माेदी यांनी पटवून दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी