शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

G20 शिखर परिषदेसाठी ITPO कॉम्प्लेक्स सज्ज; २६ जुलैला नरेंद्र मोदी करणार उद्घाटन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:37 IST

७ हजार लोकांसाठी आसनव्यवस्था, आलिशान अॅम्फी थिएटर!

नवी दिल्ली : भारतातील G20 नेत्यांच्या बैठका दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित आयटीपीओ (ITPO) कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ जुलै रोजी या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन होणार आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) च्या मालकीच्या जागेच्या पुनर्विकासाची जबाबदारी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या बांधकाम कंपनीला देण्यात आली होती. 

प्रगती मैदान सुमारे १२३ एकर परिसरात पसरलेले, हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे एमआयसीई (मीटिंग, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन) कार्यक्रम आयोजित करेल. पुनर्विकसित आणि आधुनिक IECC कॉम्प्लेक्सचा जगातील १० सर्वात मोठ्या प्रदर्शन आणि अधिवेशन कॉम्प्लेक्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हे जर्मनीतील हॅनोव्हर प्रदर्शन केंद्र आणि शांघायमधील राष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रला टक्कर देऊ शकते.

७ हजार लोकांसाठी आसनव्यवस्था, आलिशान अॅम्फी थिएटर!IECC पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या भारताच्या क्षमतेची साक्ष आहे. कन्व्हेन्शन सेंटरच्या लेव्हल ३ वर ७ हजार लोकांची आसनक्षमता आहे, तर ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित सिडनी ऑपेरा हाऊसची बसण्याची क्षमता अंदाजे साडेपाच हजार आहे. याशिवाय, IECC कडे तीन हजार व्यक्तींच्या आसनक्षमतेसह एक भव्य अॅम्फीथिएटर देखील आहे, जे ३ PVR थिएटरच्या समतुल्य आहे. याठिकाणी प्रदर्शन, सांस्कृतिकआणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

व्यवसाय आणि नेटवर्किंगसाठी उत्तम व्यासपीठ!IECC येथे जागतिक स्तरावर मेगा परिषद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातील. यामध्ये उत्पादने, नवकल्पना आणि विचारांचे प्रदर्शित करण्यासाठी सात नवीन  प्रदर्शनी हॉल देखील आहेत. हे अत्याधुनिक हॉल प्रदर्शक आणि कंपन्यांना आपल्या प्रेक्षकांशी संलग्न राहण्यासाठी, व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करतील.

५ हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थायाचबरोबर, IECC मध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी साडेपाच हजारहून अधिक वाहनांसाठी पार्किंग देखील आहे. सिग्नलमुक्त रस्त्यांमुळे अभ्यागतांना कोणत्याही त्रासाशिवाय कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची सुविधा करण्यात आली आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी