शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

"विकास पोहतोय...", पावसामुळं 'भारत मंडपम'मध्ये भरलं पाणी; काँग्रेसनं साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 14:19 IST

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० परिषदेदरम्यान मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्रमस्थळी अडचणी वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० परिषदेसाठी देशाच्या राजधानीत जागतिक नेत्यांचा कुंभमेळाच जमला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते जी २० परिषदेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० परिषदेदरम्यान मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्रमस्थळी अडचणी वाढल्या आहेत.

जी २० सदस्यांच्या मेजवानीसाठी बांधलेल्या भारत मंडपमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सर्वत्र पाणी दिसत आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाण्याने भरलेल्या भारत मंडपमचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी म्हटले आहे की, "जी २० सदस्यांच्या मेजवानीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या 'भारत मंडपम'चे फोटो. विकास पोहत आहे..."

दुसरीकडे, हाच व्हिडिओ एक्सवर काँग्रेसच्या अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्म आयएनसी-टीव्हीने देखील शेअर केला आहे. पोकळ विकासाची पोलखोल झाली. जी २० साठी भारत मंडपम तयार करण्यात आला. २७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. एका पावसात पाणी वाहून गेले, असे हा व्हिडिओ शेअर करताना आयएनसी-टीव्हीने म्हटले आहे. दरम्यान, या भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह ३० हून अधिक देश आणि संघटनांच्या नेत्यांसाठी मेजवानीचे आयोजन केले होते.

भारत मंडपममध्ये रचला इतिहासजी २० परिषदेच्या पहिल्या दिवशी भारत मंडपममध्ये इतिहास रचला गेला. भारताच्या अध्यक्षतेखाली या जी २० परिषदेत आफ्रिकन युनियननेही औपचारिक प्रवेश केला. यासोबतच नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित करण्यात आला. हे घोषणापत्र पारित होणे हे देशासाठी मोठा विजय असून भारताच्या नेतृत्वावर जागतिक नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले जात आहे. जाहीरनाम्यात भारताचा नऊ वेळा उल्लेख करण्यात आला. तसेच,  रशिया-युक्रेनच्या संवेदनशील मुद्द्यावर सर्व नेत्यांना संयुक्त निवेदनावर सहमती मिळवून देणे ही त्याची सर्वात मोठी उपलब्धी होती. १०० हून अधिक मुद्द्यांवर एकमत निर्माण करून भारताने या व्यासपीठावर ग्लोबल साउथचा एक प्रमुख आवाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख प्रस्ताव- सर्व देश शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करतील. भारताच्या पुढाकारात ‘एक भविष्य आघाडी’ स्थापन होईल.- जैविक इंधन आघाडीची स्थापना केली जाईल. आघाडीत भारत, अमेरिका आणि ब्राझील संस्थापक सदस्य असतील.- एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य यावर जोर दिला जाईल.- बहुपक्षीय विकास बँकांना बळ दिले जाईल. त्यांना अधिक कार्यक्षम केले जाईल.- क्रिप्टोकरन्सीसंदर्भात जागतिक पातळीवर धोरण निश्चित करण्यासाठी चर्चा केली जाईल. कर्जप्रणालीसाठी आणखी चांगली व्यवस्था निर्माण करणे. वेगाने - विकसित होणाऱ्या शहरांना निधी उपलब्ध करणे.- हरित आणि अल्प कार्बन ऊर्जा तंत्रज्ञानासाठी काम केले जाईल.- दहशतवादाचा सर्व देशांकडून विरोध केला जाईल. - अण्वस्त्रांचा वापर किंवा हल्ल्याची धमकी देणे अस्वीकारार्ह असेल. एखाद्या देशाच्या भूभागावर ताबा घेण्याचा किंवा त्याबाबत धमकी देण्यास विरोध करणे. तसेच सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखणे.- मानवी दुःख, जागतिक अन्न आणि ऊर्जा सुरक्षिततेसाठी युक्रेनमधील युद्धाच्या नकारात्मक प्रभावांवर प्रकाश टाकणे. युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत आणि दीर्घकालीन शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे. - कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित धोके लक्षात घेता, त्याचा सकारात्मक वापर करण्यावर भर देणे. निर्णयप्रक्रियेत महिलांना पूर्ण, समान. 

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदcongressकाँग्रेस